देशातील सर्वात मोठी एसयूव्ही उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्राने आता ऑटोक्षेत्रात एक नवी गाडी लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. ही एक पिकअप एसयूव्ही असून स्कॉर्पिओ एनवर आधारित असणार आहे. ही पिकअप गाडी डबल कॅब आणि सिंगल कॅब प्रकारात असणार आहे. त्यामुळे ही गाडी लाइफस्टाइल खरेदीदार आणि व्यावसायिक खरेदीदार या दोघांना उपयुक्त ठरेल. महिंद्रा स्कॉर्पिओ एन पिकअप टोयोटा हिलक्स आणि इसुझू डी-मॅक्स व्ही-क्रॉस सारख्या इतर लाइफस्टाइल पिकअपशी स्पर्धा करेल.या पिकअप गाडीची लाँच तारीख काही अद्याप निश्चित नाही. पण डिझाईन आणि तंत्रज्ञानाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
या गाडीचं डिझाईन जवळपास स्कॉर्पिओ एन सारखंच आहे. पण अधिक कार्यक्षम करण्यासाठी काही बदल केले आहे. डबल कॅब डिझाईनमुळे बसण्यासाठी आरामदायी जागा असेल. तसेच सामान वाहून नेण्याची क्षमता असेल. एक नवीन फ्रंट ग्रिल, मजबूत बंपर आहे. तर वर बसवलेला रोलओव्हर बारमुळे एक मोठा लोडिंग एरिया दिसतो. शार्क-फिन अँटेनामुळे आधुनिक लूक दिसतो. तर स्टीलची चाके आणि हॅलोजन लाईट्समुळे अधिक आकर्षक दिसते.
या गाडीच्या फीचर्सबाबत फार काही माहिती समोर आलेली नाही. पण कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये लेव्हल- एडीएएस, मल्टीपल एअरबॅग्ज, 5जी कनेक्टिव्हिटी, ट्रेलर स्वे कंट्रोल आणि ड्रायव्हर थकवा इशारा देणारी यंत्रणा दाखवली होती. त्यामुळे या मॉडेलमध्ये हे फीचर्स दाखवले होते. त्यामुळे गाडी प्रत्यक्षात समोर आल्यानंतर यात काही अधिकची फीचर्स असू शकतात. यात टॉप आणि बेसिक असे दोन मॉडेल असतील. या दोन्ही प्रकारात सुरक्षेशी संदर्भात वैशिष्ट्ये असतील. तसेच इन्फोटेनमेंट सिस्टमही असेल. ऑफ-रोडिंग मजेदार बनवण्यासाठी महिंद्रा 4एक्सप्लोर 4डब्ल्यूडी सिस्टम देखील असेल.
या पिकअप गाडीसाठी स्कॉर्पिओ एन आणि थारवर अधारित इंजिन दिलं जाण्याची शक्यता आहे. महिंद्राचे 2.0 लिटर एमस्टॅलियन टर्बो – पेट्रोल आणि 2.2 लिटर एमहॉक डिझेल इंजिन यांचा समावेश असू शकतो. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक असू शकतो. रियर व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राइव्ह दोन्ही उपलब्ध असतील