भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतासाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. मालिकेत राहण्यासाठी हा सामना जिंकवा किंवा ड्रॉ करणं भाग आहे. त्यामुळे भारतीय संघावर दडपण असणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडने हा सामना जिंकला की मालिका खिशात घालणार आहे. मँचेस्टर मैदानात भारताचा इतिहास काही चांगला नाही. त्यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी खूप घाम गाळावा लागणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यांचा नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. कर्णधार बेन स्टोक्स याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. गोलंदाजीसाठी योग्य ओव्हरहेड कंडिशन आहे. दरम्यान आम्हाला चांगला ब्रेक मिळाला आहे. घरी परतण्याची आणि बॅटरी रिचार्ज करण्याची सर्वांना चांगली संधी आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सर्व काही सोडले. आमचे तीन सामने शेवटच्या सत्रापर्यंत गेले आहेत, जे संघांच्या गुणवत्तेबद्दल बरेच काही सांगते. सामान्य मँचेस्टरची खेळपट्टी बरीच मजबूत आणि काही गवत आहे. संघात डॉसन परतला आहे. त्याने शेवटची कसोटी खेळून बराच काळ लोटला आहे. गेल्या काही वर्षात चांगला खेळला आहे.’
विशेष म्हणजे या मैदानात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा संघ कधीच जिंकलेला नाही. दुसरीकडे, भारताने चारही कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आहे. दुसरीकडे शुबमन गिलने याबाबत आपलं मत मांडलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘मी खरंच गोंधळलो होतो. नाणेफेक हरणे चांगले ठरले. गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आपण ज्या पद्धतीने खेळलो ते उत्कृष्ट होते. काही कठीण क्षण आम्ही गमावले आहेत, परंतु आम्ही त्यापेक्षा जास्त सत्रे जिंकली आहेत. थोडा ब्रेक हवा होता. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये तीव्रता होती. चांगली कामगिरी दिसते. चार-पाच दिवसांत काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. ‘
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (डब्ल्यू), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.