नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याद्वारे Myntra आणि त्यांच्या इतर आस्थापनांविरोधातत विरोधात 1654 कोटींची केस दाखल केली आहे. बंगळुरुच्या विभागीय ईडी कार्यलयानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार Myntra आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग हे होलसेल कॅश अँड कॅरी ऑपरेशन्स सुरु होतं. थेट परकीय गुंतवणूक धोरणानुसार सध्या मान्य नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं कंपनीच्या काही कागदपत्रांची आणि वित्तीय रेकॉर्डसची तपासणी सुरु केली आहे. Myntra नं विदेशी फंड्सचा चुकचा वापर केला की नियम बाजूला ठेवले, याचा शोध घेतला जात आहे.
Myntra.com ची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. त्यावेळी गिफ्टची विक्री केली जात होती. त्यानंतर कंपनीनं 2011 मध्ये फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांची विक्री सुरु केली. 2014 मध्ये Myntra ची खरेदी फ्लिपकार्टनं केली. 2015 मध्ये कंपनीनं एप लाँच केलं. Myntra त्यानंतर Jabong.com ला खरेदी करुन देशातील सर्वात मोठा फॅशन प्लॅटफॉर्म बनलं. त्यानंतर Myntra नं बंगळुरुतील विटवर्क्स या स्टार्टअपची खरेदी केली. 2021 मध्ये लोगो मुळं Myntra कंपनी वादात अडकली होती. नाज एकता पटेलच्या विरोधानंतर कंपनीच्या लोगोत बदल करण्यात आला होता.
कोणत्या कंपनीनं किंवा व्यक्तीनं विदेशी पैशांचा चुकीचा वापर करु नये, उदा. मनी लाँड्रिंग किंवा कर चोरी. विदेशी गुंतवणूक किंवा व्यापार सोपा होतो. मात्र, फेमा द्वारे विदेशी पैशांच्या देवाण घेवाणीवर नियंत्रण ठेवलं जातं. या कायद्यानुसार ईडीला विदेशी चलन कायदे किंवा नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याची आणि दंड लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
फ्लिपकार्ट Mynra ची पेरेंट कंपनी आहे. 2014 मध्ये फ्लिपकार्टनं 2 हजर कोटी रुपयांना Myntra ची खरेदी केली होती. ज्यावेळी फ्लिपकार्टनं Myntra ची खरेदी केली होती त्यावेळी त्यांच्याकडे 1000 ब्रँडची 15000 उत्पादनं होतं. फ्लिपकार्टनं Myntra ची रचना बदलली नाही. Myntra आजही स्वतंत्रपणे काम करते.
मिडिया रिपोर्टनुसार Myntra कडे चार कोटी व्यवहार करणारे ग्राहक आहेत. कंपनीचा महसूल 2023 मध्ये 4375 कोटी रुपये होता.
आणखी वाचा