असं म्हणतात की, आपला आहार जसा असेल तसे आपले आरोग्य असते. त्यामुळे तज्ञमंडळी दुपारी पोटभर जेवण्यास सांगतात आणि रात्री जड अन्न खाण्यास मनाई करतात. रात्री जड अन्नपदार्थं खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात जसे की, गॅस, आम्लपित्त आणि पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. त्यात काहींना रात्री चटपटीत खाण्याचे क्रेव्हिंग होते. या क्रेव्हिंगमुळे जंकफूड खाल्ले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक असते. मग, निरोगी आरोग्यासाठी रात्रीचा आहार नेमका काय करावा? कोणत्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा, जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरे,
मूग डाळ सूप –
मूग डाळीच्या सूपाचा रात्रीच्या जेवणात समावेश करावा. हे सूप पचायला सोपे असते याशिवाय यातील प्रोटिन्स पोट भरलेले ठेवते. तुम्हाला रात्री क्रेव्हिंग होत असेल तर मूग डाळ सूप नक्की प्यावे.
ट्रोक्स फ्रॉस्ट फिश –
भाजलेले मखाना रात्रीच्या हलका आहारासाठी उत्तम पर्याय आहे. यात कमी कॅलरीज असतात आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. परिणामी, वजन नियंत्रणात राहते.
फ्राय चीज –
दिर्घकाळ पोट भरलेले राहण्यासाठी फ्राय पनीर उत्तम पर्याय आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात.
काकडी शेंगदाणा चाट –
जर तुम्हाला रात्री काही हलकं-फुलकं खायची इच्छा होत असेल तर काकडी शेंगदाणा चाट खाऊ शकता. यात हेल्दी फॅट, फायबरचे प्रमाण अधिक असते. तसेच काकडी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
पोहे –
कमी तेलात बनवलेले पोहे तुम्ही रात्रीच्या जेवणात खाऊ शकता. यामुळे दिर्घकाळ भरलेले राहते.
हळदीचे दूध –
भूक नसतानाही काही खाण्याची इच्छा होत असेल तर एक कप गरम दूधात हळद टाकून तुम्ही पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रात्री चांगली झोप लागेल.
हेही पाहा –