मेटाटार्सल फ्रॅक्चर म्हणजे पायाच्या मधल्या भागातील पाच लांब हाडांपैकी एक किंवा अधिक हाडांचे तुटणे, जे रिषभ पंतला मँचेस्टर कसोटीत झाले.
रिषभ पंतला ख्रिस वोक्सच्या यॉर्करवर रिव्हर्स स्वीप खेळताना पायाला मार लागला, ज्यामुळे सूज आणि रक्तस्त्राव होऊन तो मैदान सोडून गेला.
रिकी पाँटिंगने मेटाटार्सल फ्रॅक्चरची भीती व्यक्त केली, कारण त्वरित सूज आणि वेदना यामुळे पंत कदाचित संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडू शकतो.
Rishabh Pant metatarsal fracture injury: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात ख्रिस वोक्सच्या चेंडूने उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पायावर सुज आली असून रक्त आले होते. ताबडतोब डॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून पंतच्या पायाला मेटाटार्सल फ्रॅक्चर झाल्यामुळे सहा आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मेटाटार्सल फ्रॅक्चर म्हणजे काय आणि याचे प्रकार किती हे जाणून घेऊया.
पंतच्या पायावर सुज आली असून रक्त देखील आले होते. पंतला चालणे देखील अवघड झाले आहे. पायावर जास्त दाब न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तज्ञांच्या मते, मेटाटार्सल फ्रॅक्चर म्हणजे पायाच्या मध्यभागातील पाच लांब हाडांपैकी एक किंवा अधिक हाडं तुटणे. डॉक्टर म्हणतात की ही हाडे पायाची बोटे घोट्याशी जोडतात. मेटाटार्सल फ्रॅक्चर हा पायाच्या दुखापतीचा एक सामान्य प्रकार आहे. या प्रकारचे फ्रॅक्चर सहसा पायाच्या हाडांवर वारंवार ताण पडल्याने होते. किंवा जेव्हा एखादी व्यक्ती उडी मारते किंवा वेगाने दिशा बदलते आणि त्याचा पाय किंवा घोटा चुकीच्या दिशेने वळवते तेव्हा ते होऊ शकते. बर्फाचा वापर करून आलेली सूज कमी करू शकते. मेटाटार्सल फ्रॅक्चरचे तीन प्रकार आहेत, जे तीन झोनमध्ये वर्गीकृत आहेत.
एव्हल्शन फ्रॅक्चर (Avulsion Fracture)पाचव्या मेटाटार्सल फ्रॅक्चरपैकी 90 टक्क्यांहून अधिक फ्रॅक्चर हे असतात. एव्हल्शन फ्रॅक्चरमध्ये, हाडाचा एक छोटासा तुकडा हाडाच्या मुख्य भागातून टेंडन किंवा लिगामेंटने ओढला जातो, ज्यामुळे तो तुटतो. या प्रकारचे फ्रॅक्चर घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे होते. घोट्याच्या मोचनेसह एव्हल्शन फ्रॅक्चर होतात तेव्हा ते अनेकदा दुर्लक्षित केले जातात.
जोन्स फ्रॅक्चर (Jones Fracture)हे पाचव्या मेटाटार्सल हाडाच्या एका लहान भागात होते. जिथे कमी रक्त येते आणि बरे होण्यास अडचणी येतात. डॉक्टर म्हणतात की जोन्स फ्रॅक्चर एकतर स्ट्रेस फ्रॅक्चर किंवा तीव्र ब्रेक असू शकते.
मिड-शाफ्ट फ्रॅक्चर (Mid-shaft fracture)याला डान्सर्स फ्रॅक्चर असेही म्हणतात, हे सहसा दुखापत किंवा वळणामुळे होते. हे फ्रॅक्चर मेटाटार्सल डोके आणि मान येथे होतात.
मेटाटार्सल फ्रॅक्चर कशामुळे होते?डॉक्टर म्हणतात की मेटाटार्सल फ्रॅक्चरचे सर्वात मोठे कारण म्हणजे पायाला झालेली दुखापत.
पायाला मार लागणे
पायाच्या बाहेरील बाजूस जास्त दाब पडणे
दुखापत झालेल्या पायाचा अतिवापर
तुमचा घोटा आणि पाय आतल्या बाजूला वळणे
दुखापतीमुळे पाय मुरगडणे
उपचार कोणते?मेटाटार्सल फ्रॅक्चरचा उपचार हा तुटलेली हाडे जागेवरून सरकली आहेत की नाही, तसेच तुमच्या हालचालींची पातळी, वय आणि एकूण आरोग्य यावर अवलंबून असतो.
स्थिरीकरणजर डॉक्टरांना हाडं जागी आहे आणि योग्यरित्या एकाच जागी आहे असे आढळले तर ते स्थिरीकरण सुचवू शकतात. जे सहसा एव्हल्शनसाठी आवश्यक असलेला एकमेव उपचार असतो. जोन्स फ्रॅक्चरवर देखील याने उपचार केले जाऊ शकतात. तुमची दुखापत बरी होईपर्यंत तुमचा पाय कास्ट, बूट किंवा कडक सोल असलेल्या शूमध्ये ठेवला जाईल आणि तुम्ही हालचाल करण्यासाठी क्रॅच वापरू शकता.
शस्त्रक्रियाजर तुमचं हाडं जागेवरून सरकले असेल किंवा ३ मिमी पेक्षा जास्त सरकले असेल तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. जर शस्त्रक्रिया न करता उपचार केले तर दुखापत बरी होण्याची शक्यता कमी असते. मिड-शाफ्ट फ्रॅक्चरसाठी देखील हे सहसा सुचवले जाते. या प्रक्रियेत, हाड जागेवर ठेवण्यासाठी तुमच्या पायात एक पिन, स्क्रू, रॉड किंवा प्लेट घातली जाते. ज्यामुळे हाड बरे झाल्यानंतरही जागीच राहते.
कोणत्या गोष्टी टाळाव्यातुमच्या पायाला दुखापत झाली असेल तर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी पाय वर किंवा उंचीवर ठेवावा. ज्या हालचाली किंवा क्रियामुळे फ्रॅक्चर झाले आहे ते करू नका. दुखापत झालेल्या पायावर जास्त ताण देणे टाळावे.
मेटाटार्सल फ्रॅक्चर म्हणजे नेमके काय?
मेटाटार्सल फ्रॅक्चर म्हणजे पायाच्या मधल्या भागातील पाच लांब हाडांपैकी एक किंवा अधिक हाडांचे तुटणे, जे जास्त दबाव किंवा आघातामुळे होते.
रिषभ पंतला मेटाटार्सल फ्रॅक्चर कसे झाले?
भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रिषभ पंतला ख्रिस वोक्सच्या यॉर्करवर रिव्हर्स स्वीप खेळताना दुखापत झाली आणि ज्यामुळे सूज आणि फ्रॅक्चर झाले.
रिषभ पंतच्या दुखापतीमुळे भारतीय संघावर काय परिणाम होईल?
पंतच्या अनुपस्थितीत भारताला फलंदाजी आणि यष्टिरक्षणात मोठा फटका बसेल, कारण त्याची आक्रमक शैली संघाला गती देते.