तुम्हारे स्टोरी मे ताकत है तो पब्लिक डिमांड करेगी नही तो फिर कौन डिमांड करेगा. पिक्चर तुम्ही काय बनवलाय आणि लोकांना काय पसंद आहे यावर निर्णय होतो. आपण हॉलिवूड मध्ये बघितला तर तिथे पण ओढून ताणून चित्रपट लागत नाही, असा खरमरीत टोला गुणरत्न सदावर्तेंनी यांनी मनसेला लगावला. सध्या ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाला थिएटरमध्ये प्रीमियम स्लॉट मिळत नसल्याने ओरड होत असतानचा या वादात गुणरत्न सदावर्तेंनी सुद्धा उडी घेतली आहे. त्यांनी मनसेला डिवचले आहे. थिएटर देणे त्यांच्याकडे काय चालणार आणि काय चालवायचं हा मल्टिप्लेक्स वाल्यांचा निर्णय आहे अमय खोपकरांनी लोकांना धमकी देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.
तुमची गुंडागर्दी चालणार नाही
जे गुंडगिरीची भाषा चालली आहे ना मल्टिप्लेक्स वर दगड मारणार. गुंडागर्दी की भाषा बंबई में नाही चाले. फिल्म एन्टरटेन्मेंट है पब्लिक डिमांड वर चालत असते. ज्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही ते चित्रपट का बघतील, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला. तो मल्टिप्लेक्स वाल्यांचा अधिकार आहे. आर्टिकल ९१ जी भारतच संविधान हक्क देतो. मल्टिप्लेक्स आणि फिल्मी दुनिया त्यांच्या मर्जीने ते व्यक्त करू शकतात. थिएटर वाले त्यांचं मर्जीने व्यवसाय करू शकतात.
त्या सिनेमात पब्लिकचा नाही इंटरेस्ट
ये रे ये रे पैसा मध्ये पब्लिकचा इंटरेस्ट नाही. लोकांना इमोशनल लव स्टोरी पाहिजे. यशराज फिल्म ने जे चित्रपट त्यामध्ये लक्षात घ्या यशराज कुठे आणि हे खोपकर कुठे? ते म्हणाले जे चित्रपट दाखवणार नाही, तिथं दगड मारू किंवा काच फुटतील जे काय आहे त्याबाबतीची गंभीर दखल पोलिस आयुक्त मुंबई आणि पोलीस महासंचालकांनी घ्यावी संबंधित स्थानिक पोलिसांनी पण घ्यावी. काही लोक व्यक्त होऊन समाजात तेड निर्माण करायचा काम करतात, अशी टीका सदावर्तेंनी केली आहे.
त्यांच्या चित्रपटात गर्दी खेचण्याची नाही ताकद
हिंदी पिक्चर असो वा मराठी पिक्चर, पिक्चर तर पिक्चर आहे तमिळ असो किंवा भोजपुरी मराठी असो किंवा हिंदी चित्रपटामध्ये ताकत असली पाहिजे. खोपकरांच्या पिक्चर मध्ये ती ताकत नसेल म्हणून लोक तिकीट घेत नसतील तर अर्थ काय, असे सदावर्ते म्हणाले. संजय राऊतांनी गणपती बाप्पा म्हणत खरं सांगाव ये रे ये रे पैसा चित्रपट बघितला का? राज ठाकरेंनी हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितला आहे का? असा सवाल त्यांनी केला.
तर संजय राऊत यांच्यावर आता अमेय खोपकरांनी चित्रपट काढावा, असा चिमटाही सदावर्तेंनी काढला. अमय खोपकरांकडे एक स्कोप आहे..संजय राऊत यांच्यावर पिक्चर काढा. लबाड गप्पा बंद करा..असा चित्रपट काढा. ३/४ भाषा मिळून गाण बनवा खूप चालेल हा चित्रपट, असा टोला त्यांनी लगावला.
पोरांमध्ये कुंचम कुंचमचे वेड
सैय्यरा हा चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे. सध्या पोरांची परीक्षा सुरू नाहीत पोरांमध्ये कुंचम कुंचम वेड असत. ये रे ये रे पैसा यांच्या टायटल मधेच गम दिसायला लागलंय. नुसता पैसा पैसा पैसा. एका डायलॉग पुरता टायटल ठीक आहे. पिक्चर साठी हे टायटल नाही. तुम्ही आंदोलन केले तर तुमची लोक तिकीट काढून बसणार का पिक्चरला असा सवाल सदावर्तेंनी केला.
चित्रपटाला पब्लिक डिमांड पाहिजे. फिल्मी दुनिया मध्ये असा भाषिक वाद जरा पण नाही.कुणाला असा वाद करायला वेळ नाही. भाषेवर वाद निर्माण करून माझा लावा..असा म्हणत पिक्चरच्या नावावर धंदा करायचा मागे लागले आहे. तुम्ही दगड काय एक कंकर पण मारू शकणार नाहीत..आणि हे तुम्हाला कायदेशीर परवडणार नाही. भाषिक वादामुळे अर्थनितीवर परिणाम होऊ शकतो, असे सदावर्ते म्हणाले.