ED raid update : 'ईडी'चा अंबानींना झटका, उद्योगविश्वात खळबळ! अधिवेशन सुरू असतानाच कंपन्यांवर छापे...
Sarkarnama July 26, 2025 08:45 AM

बातमीत थोडक्यात महत्वाचे :

  • अनिल अंबानी यांच्या विविध कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईतील कार्यालयांवर छापेमारी केली, ज्यामुळे उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.

  • SBI ने रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज व्यवहारात अनियमितता आढळल्याने अंबानींना 'फ्रॉड' घोषित केले असून, संबंधित काळात ₹3000 कोटींच्या कर्जातही घोटाळ्याचा संशय आहे.

  • सार्वजनिक निधीच्या गैरवापरासाठी रचलेल्या षड्यंत्रात बँक कर्मचारी, गुंतवणूकदार, शेअरधारक यांची फसवणूक झाली असून, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

  • Anil Ambani Group Companies Under Investigation : सक्तवसुली संचालनालयाने गुरूवारी मोठं पाऊल उचलत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर छापेमारी केली आहे. मनी लॉर्न्डिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये अंबानींच्या विविध कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांमध्ये ईडीकडून तपास सुरू करण्यात आला आहे. थेट अंबांनींच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्याने उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे.

    स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नुकतेच अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केले आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच बँकेने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीच्या लोन अकाऊंटला झटका दिला होता. तसेच कंपनीला डिसेंबर 2023, मार्च 2024 आणि सप्टेंबर 2024 मध्ये कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती.

    कंपनीने उत्तर दिल्यानंतर बँकेकडून अंबानी यांच्यावर फ्रॉडचा ठपका ठेवला. अंबानी यांच्या कंपन्यांनी कर्जाच्या अटींचे पालन केले नाही. आपल्या खात्यांमधील व्यवहारांमध्ये अनियमिततांविषयी संपूर्ण माहिती दिली नाही, असे आरोप अंबानींवर आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.

    Next Vice President : 'बिहार'साठी सारा खेळ! धनखड यांच्या राजीनाम्यानंतर 'हा' मोठा नेता उपराष्ट्रपती होणार? केंद्रीय मंत्राने घेतली भेट

    नॅशनल हाऊसिंग बँक, नॅशनलल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी, बँक ऑफ बडोदा आणि सीबीआयच्या दोन एफआयआरच्या आधारे ईडीने छापेमारी केली आहे. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आस्थापनांमध्येही तपास केला जात असल्याचे समजते.

    सार्वजनिक पैशांचा गैरवापर करण्यासाठी सुनियोजित षडयंत्र रचण्यात आल्याचे पुरावे ईडीने तपासात मिळाल्याचे समजते. यामध्ये अनेक संस्था, बँका, शेअरधारक, गुंतवणूकदार यांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्यामध्ये कुणी लाच घेतली किंवा नाही, याचाही तपास सुरू आहे. बँकेतील अधिकाऱ्यांवर यामध्ये संशय व्यक्त केला जात आहे.

    Nitish Kumar Politics: मोदी-शहांचं पुन्हा धक्कातंत्र? नितीशकुमार उपराष्ट्रपती अन् बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री?

    वर्ष 2017 ते 2019 या कालावधीत येस बँकेकडून घेतलेल्या 3 हजार कोटींच्या कर्जामध्ये मोठा घोळ झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सीबीआयने यापूर्वीच अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सला फ्रॉड म्हणून घोषित केले आहे.

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  • प्रश्न: ईडीने कोणत्या कारणावरून अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर छापे टाकले?
    उत्तर: मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणांमुळे.

  • प्रश्न: कोणत्या कंपनीच्या लोन अकाऊंटवर SBI ने फ्रॉडचा ठपका ठेवला आहे?
    उत्तर: रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या.

  • प्रश्न: या प्रकरणात कोणत्या कालावधीतील कर्ज व्यवहार तपासले जात आहेत?
    उत्तर: वर्ष 2017 ते 2019 दरम्यानच्या येस बँक कर्ज व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

  • प्रश्न: या घोटाळ्यामुळे कोणत्या व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या फसवणुकीचा संशय आहे?
    उत्तर: बँका, गुंतवणूकदार, शेअरधारक आणि काही बँक अधिकाऱ्यांची.

  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.