थोडक्यात:
पावसाळ्यात दमट हवामानामुळे युरीन इन्फेक्शनचा धोका वाढतो, विशेषतः महिलांमध्ये.
भरपूर पाणी पिणे, नारळपाणी, कोथिंबीर, तुळस-मध हे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
लक्षणं गंभीर असल्यास किंवा काही दिवसांत बरे न झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Monsoon Urinary Infection Home Remedies: पावसाळा सुरू झाल्यामुळे हवामानात दमटपणा वाढला आहे. या दिवसांत कपडे उशिरा सुकतात आणि शरीराची स्वच्छता नीट राखली नाही, तर बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे युरीन इन्फेक्शन (UTI) होण्याचा धोका वाढतो.
हा त्रास विशेषतः महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. या आजारात लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी लागणे, पोटाखाली दुखणे अशा तक्रारी सामान्य आहेत. मात्र, वेळेवर काळजी घेतल्यास आणि काही घरगुती उपाय केल्यास हा त्रास टाळता येतो. खाली दिलेले उपाय या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मदत करू शकतात.
PM Internship Scheme: टॉप कंपन्यांमध्ये 1.53 लाख युवकांना इंटर्नशिपची संधी; दरमहा मिळणार 5000 रुपये हे काही घरगुती उपाय करा 1. पाणी भरपूर प्यादररोज किमान ८-१० ग्लास पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यास मदत होते आणि मूत्रमार्ग स्वच्छ राहतो.
2. नारळपाणी रोज प्यानारळपाणी शरीर थंड ठेवते आणि मूत्रविसर्जन स्वच्छ करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
3. कोथिंबिरीचा रसकोथिंबीर ही थंड प्रकृतीची असते. तिचा रस घेतल्यास युरीन इन्फेक्शनमुळे होणारी जळजळ आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास जेवताना एक वाटी कच्ची कोथिंबीर खाल्ली तरी ती उपयुक्त ठरते.
4. तुळस आणि मधतुळशीची ४-५ पाने वाटून त्यात एक चमचा मध मिसळा आणि रोज सकाळी हे मिश्रण घ्या. तुळशीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्गावर प्रभावी ठरतात.
5. योगासनं आणि प्राणायामदररोज नियमित योगासनं आणि प्राणायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते व प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे इन्फेक्शनशी लढणे सोपे जाते.
6. मेथी दाण्याचा काढामेथी दाणे उकळून, गाळून ते पाणी प्यायल्यास युरीन इन्फेक्शनपासून आराम मिळतो. हा काढा दिवसातून एकदा घेणे उपयुक्त ठरते.
7. हळदीचं दूधरात्री झोपण्यापूर्वी गरम दूधात अर्धा चमचा हळद घालून प्यावे. हळद हे नैसर्गिक अँटीसेप्टिक असून सूज आणि संसर्ग दोन्हीवर प्रभावी आहे.
Makhana Benefits: पुरुषांच्या आरोग्यासाठी मखाना का आहे परफेक्ट फूड? जाणून घ्या वैज्ञानिक कारण यासोबतच या गोष्टी लक्षात ठेवा- दररोज वेळेवर लघवी करा, लघवी थांबवून ठेवू नका.
- ओले कपडे लगेच बदला आणि खालचा भाग कोरडा ठेवा.
- सिंथेटिक कपड्यांऐवजी सुताच्या अंतर्वस्त्रांचा वापर करा.
- गरम, तिखट आणि तेलकट अन्न खूप प्रमाणात टाळा.
- पाणी भरपूर प्रमाणात प्या (दिवसभरात किमान २-३ लिटर).
डॉक्टरकडे कधी जावं?- लक्षणं २-३ दिवसांनंतरही कमी होत नाहीत
- लघवीतून रक्त येतंय
- ताप किंवा कंबरदुखी वाढतेय
- अशा वेळी वेळ न घालवता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
FAQs1. पावसाळ्यात युरीन इन्फेक्शन का जास्त होतं? (Why is urinary infection more common during the rainy season?)
उत्तर: पावसाळ्यात दमटपणा वाढल्याने बॅक्टेरियांची वाढ जलद होते आणि स्वच्छता नीट न राखल्यास इन्फेक्शनचा धोका वाढतो.
2. युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी घरगुती उपाय कोणते? (What are some home remedies to prevent UTI?)
उत्तर: भरपूर पाणी, नारळपाणी, कोथिंबीर, तुळस-मध, हळदीचं दूध, मेथी काढा हे उपाय फायदेशीर आहेत.
3. कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? (When should one consult a doctor?)
उत्तर: लक्षणं २-३ दिवसांनंतरही कमी न झाल्यास, लघवीतून रक्त आल्यानं किंवा ताप-कंबरदुखी वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. युरीन इन्फेक्शन रोखण्यासाठी दैनंदिन सवयी कोणत्या असाव्यात? (What daily habits help in preventing UTI?)
उत्तर: वेळेवर लघवी करणे, स्वच्छता राखणे, सुताचे कपडे वापरणे आणि तिखट-तेलकट अन्न टाळणे आवश्यक आहे.