Mumbai Local Blast : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सुप्रीम' स्थगिती, पण आरोपींना मात्र दिलासा
Saam TV July 26, 2025 08:45 AM
  • २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती .

  • महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

  • आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलेलं नाही, मात्र त्यांना नोटीस बजावली आहे.

What did the Supreme Court say on 2006 Mumbai blasts verdict? : 2006 च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. बॉम्बे हायकोर्टाने 21 जुलै 2025 रोजी या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केली होती. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने 24 जुलै 2025 रोजी या याचिकेवर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

आज झालेली ही जजमेंट दुसऱ्या मकोका केसमधे वापरली जाईल, त्यामुळं या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने SG तुषार मेहता यांनी कोर्टाला केली होती. न्यायमूर्ती सुंद्रेश यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हाय कोर्टाच्या निर्णायाला स्थगिती दिली आहे. हायकोर्टाने अभियोजन पक्ष पुरावे सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आणि साक्षीदारांचे जबाब विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले होते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने युक्तिवाद केला.

Hotel Bhagyashree : हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण, चौघांनी गाडीत कोंबलं, बेदम मारलं अन् फेकून दिलं, व्हिडिओ

आरोपींना दिलासा कायम ?

कोर्टाने स्थगिती दिली असली तरी आरोपींना मात्र मोठा दिलासा मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असली तरी आरोपींना मात्र पुन्हा जेलमध्ये जावं लागणार नाही. सुप्रीम कोर्टाकडून उच्च न्यायालयाच्या जजमेंटला स्थगिती दिली आहे.

कोर्टाने आरोपींना नोटीस इशू केली असून त्यांना त्यांचं म्हणणं मांडावं लागणार आहे. पुढील सुनावणीत काय होत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Snakebite : ती काळरात्र ठरली! गाढ झोपेत सार्पदंश, १९ वर्षाच्या तरूणीचा मृत्यू

साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती

11 जुलै 2006 रोजी मुंबईच्याउपनगरीय रेल्वे नेटवर्कवर सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 189 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 824 हून अधिक जण जखमी झाले होते. संध्याकाळी 6:24 ते 6:35 या 11 मिनिटांच्या कालावधीत सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. हे स्फोट प्रेशर कुकरमध्ये ठेवलेल्या RDX-आधारित आयईडी (Improvised Explosive Devices) वापरून झाले. माटुंगा रोड, बांद्रा, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली, भाईंदर आणि विरार येथील ट्रेनचा समावेश होता.

आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

मुंबई साखळी बॉम्बस्फोट कधी आणि कुठे घडले?

११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये सायंकाळी ६:२४ ते ६:३५ या ११ मिनिटांच्या कालावधीत सात साखळी बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट माटुंगा, खार, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरीवली, मीरा रोड आणि भाईंदर येथे झाले.

मुंबई बॉम्बस्फोटात किती जीवितहानी झाली आणि किती जण जखमी झाले?

या हल्ल्यात १८९ ते २०९ लोक मृत्यूमुखी पडले आणि ७०० हून अधिक जण जखमी झाले.

या हल्ल्यामागील कारण काय होते?

तपासात समोर आले की, हा हल्ला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने आयएसआयच्या मदतीने घडवला होता. काही अहवालांनुसार, २००२ च्या गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी हा कट रचला गेला.

या हल्ल्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला?

दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये आरडीएक्स ठेवून बॉम्ब तयार केले होते, जे पश्चिम रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये ठेवले गेले.

या प्रकरणातील आरोपींचे काय झाले?

२००७ मध्ये विशेष न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले, पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय का स्थगित केला?

महाराष्ट्र सरकारच्या मागणीवर, ही केस दुसऱ्या मकोका खटल्यात वापरली जाऊ शकते म्हणून स्थगिती देण्यात आली.

आरोपी पुन्हा तुरुंगात जातील का?

सध्या नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय स्थगित केला असला तरी आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवलेले नाही.

हायकोर्टाने आरोपींना निर्दोष का ठरवलं होतं?

हायकोर्टाने नमूद केलं की पुरावे अपुरे होते आणि साक्षीदारांचे जबाब विश्वासार्ह नव्हते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.