Child End Of Life : शाळा का चुकवतोस आईनं विचारलं, मुलाने थेट गळफासचं घेतला; नेमकं काय चुकलं
esakal July 26, 2025 01:45 PM

End Of Life After School Question : बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील १५ वर्षीय शाळकरी मुलाने शाळा वारंवार चुकवत असल्याच्या कारणावरून आई-वडिलांनी रागावल्याच्या कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यश अनिल पाचंगे (रा. कुंभार मळा, बोरगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

यश हा आठवीत शिकत होता. तो काही दिवसांपासून शाळेला जात नव्हता. त्यामुळे वडिलांनी त्याला रागावले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २५) पुन्हा त्याने शाळेला जाण्यास नकार दिला.

Kolhapur Paytan : कोल्हापुरी पायतानला अच्छे दिन..., ब्रिटनमध्ये विकता येणार चप्पल

यावरून आईसोबत वाद झाला. त्यानंतर ‘शाळेला जातो’ असे सांगून तो घरातून बाहेर पडला. काही वेळातच त्याने जवळच असलेल्या आत्याच्या घरात वाशाला कापड बांधून घेऊन गळफास लावून आत्महत्या केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.