Health Tips: बेडरूममध्ये या वस्तू ठेवता? आरोग्यावर होईल परिणाम
Marathi July 26, 2025 03:25 PM

कधी कधी आपल्या आजूबाजूला आपण अशा काही वस्तू ठेवतो किंवा वापरतो ज्याचे परिणाम आपल्याला माहित नसतात. मात्र काही वस्तूंचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आपल्या बेडरूममध्ये देखील आपण अनेक गोष्टी ठेवतो. काही जुन्या वस्तू बेडरूममध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर आरोग्यासाठी हे घातक ठरू शकते. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया…

जुन्या उशा

आपल्याला अनेकदा एखादी जुनी उशी कायम कम्फर्टेबल वाटते. मात्र झोपताना कायम फार जुनी किंवा फाटलेली उशी वापरणे आरोग्यासाठी चांगले नसते. याचे कारण म्हणजे वर्षानुवर्षे वापरल्याने उशीत धुळीचे कण, घामाचे घटक जमा होतात. ज्यामुळे संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे तुमची उशी फार जुनी झाली असेल तर ती बदलण्याची गरज आहे.

सिंथेटिक एअर फ्रेशन्स

अनेकदा आपण बेडरूममध्ये फ्रेश वाटण्यासाठी एअर फ्रेशनर्सचा वापर करतो. मात्र तुम्हाला माहित आहे का यामध्ये काही विषारी रसायने असतात. एका संशोधनातून 86% एअर फ्रेशनर्समध्ये फॅथलेट्स असल्याचे आढळले आहे. ज्यामुळे आपल्याला अस्थमा, श्वसन समस्या, संसर्गाचा धोका निर्माण होतो.

जुनी गादी

जुन्या उशीप्रमाणे बेडरूममध्ये जुनी गादी ठेवणेही आरोग्यासाठी घातक असते. घरात गाद्या देखील आपण वर्षानुवर्षे वापरतो. मात्र जुन्या गादीमुळे तुमची झोप आणि पाठीवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही गादी फार जुनी झालेली असेल तर त्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. तसेच तुमची झोपही कमी होऊ शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.