चित्रपटांमध्ये गाडी उडताना किंवा उंचावरून खाली पडताना असे अनेक सीन असतात, ज्यांना पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवतात. पण अशा एका सीनमागे अनेकांचा जीव धोक्यात असतो, विशेषतः स्टंट करणाऱ्या कलाकारांचा. साउथ इंडस्ट्रीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक पा. रंजीत आणि अभिनेता आर्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला. कार स्टंट करताना प्रसिद्ध स्टंटमॅन राजू (मोहनराज) याचा मृत्यू झाला. त्याचा शेवटचा आणि भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सेटवर काय घडलं?
साउथ अभिनेता विशालने स्टंटमॅन राजू याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याच्या मृत्यूबद्दल दुख: व्यक्त केलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, गाडी रॅम्पवरून गेली आणि पलटून जोरात खाली पडली. गाडीचा पुढचा भाग जमिनीवर जोरात आदळला. सुरुवातीला सेटवरील सर्वजण शूटिंग करत होते, पण काही वेळाने सर्वजण गाडीकडे धावले आणि राजूला गाडीतून बाहेर काढण्यात आलं.
#India:Stunt master #SMRaju dies while performing high-risk car toppling stunt during film shoot in #TamilNadu. pic.twitter.com/JXwUZFPWn4
— CMNS_Media⚔️ #Citizen_Media🏹VEDA 👣 (@1SanatanSatya)
वाचा: स्मशानभूमीजवळ कारमध्ये बड्या नेत्याशी इश्कबाजी, महिलेसोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं.. नंतर जे घडलं
शूटिंगदरम्यान स्टंटमॅनचा मृत्यू
दिग्दर्शक पा. रंजीत सध्या त्यांच्या नव्या चित्रपट ‘वेट्टूवम’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. नागपट्टिनम येथे चित्रपटाच्या सेटवर हा मोठा अपघात घडला, ज्यामध्ये स्टंटमॅनचा मृत्यू झाला. सुरुवातीला असं सांगितलं गेलं होतं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, पण व्हिडीओ समोर आल्यानंतर स्पष्ट झालं की हा अपघात स्टंटमुळे झाला. स्टंटमॅन राजू शूटिंगदरम्यान एक SUV गाडी चालवत होते. गाडी रॅम्पवरून गेली आणि जोरात खाली पडली.
गाडीचा पुढचा भाग जमिनीवर जोरात आदळला. सुरुवातीला सर्वजण शूटिंग करत होते, पण काही वेळाने सर्वजण त्यांच्या दिशेने धावले आणि त्यांना गाडीतून बाहेर काढलं. हा व्हायरल व्हिडीओ 13 जुलैचा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या अपघातात राजू यांचा मृत्यू झाला.
विशालने काय ट्वीट केलं?
या अपघाताने साउथ इंडस्ट्री हादरली आहे. अभिनेता विशालने ट्वीट करत लिहिलं, “ही बाब पचवणं खूप कठीण आहे की कार पलटण्याचा सीन करताना स्टंटमॅन राजू यांचा मृत्यू झाला. मी राजू यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांनी माझ्या चित्रपटांमध्ये अनेक धोकादायक स्टंट केले होते. ते खूप धाडसी व्यक्ती होते.” त्याने राजू यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे.