नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी(भेल) हवाई संरक्षण आग नियंत्रक रडार खरेदीबाबतच्या करारावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. हा करार सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आहे. ही आग नियंत्रक रडार यंत्रणा भारतीय लष्कराला देण्यात येणार आहे.
लढाऊ विमाने, लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांच्या माध्यमातून होणाऱ्या हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना देण्याची क्षमता या रडारमध्ये आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
भारताने भारतात बनविलेल्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठीच्या निधीतून सुमारे दोन हजार कोटी रुपयांची तरतूद या यंत्रणेच्या खरेदीसाठी करण्यात आली असून, या रडार यंत्रणेतील सुमारे ७० टक्के भाग हे भारतात बनविण्यात आलेले आहेत. ‘‘भारतीय संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.’’ असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
Anil Chauhan: ऑपरेशन सिंदूर’ सुरूच; सरसेनाध्यक्ष चौहान, सतत सावध राहणे गरजेचे शत्रूला ५०हून कमी शस्त्रास्त्रांनी नमवले’आॅपरेशन सिंदूर दरम्यान ५० हून कमी शस्त्रास्त्रांचा वापर करून शत्रूला गुडघे टेकविण्यास कसे भाग पाडले जाऊ शकते, हे आॅपरेशन सिंदूर दरम्यान भारताने जगाला दाखवले असून इतरांसाठी हा नक्कीच अभ्यासाचा विषय ठरेल, असे प्रतिपादन हवाई दलाचे व्हाइस एअर चीफ मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी शुक्रवारी केले. सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज(सीएपीएस) आणि कॉलेज आॅफ एअर वॉरफेअर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते.