Suresh Raina’s all-time World XI surprised fans: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंड्स २०२५ ( WCL) स्पर्धेत तो इंडियन चॅम्पियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाविरुद्ध २२ जुलैला झालेल्या सामन्यात त्याने ११ चेंडूंत १६ धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर रैनाला जेव्हा त्याची जगातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची टीम विचारली, तेव्हा त्याने केलेली निवड ही आश्चर्यचकित करणारी ठरली.
सुरेश रैनानाने निवडलेल्या संघात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तीन दिग्गज खेळाडूंची नावं नाहीत. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह विंडीजचे व्हीव्हीयन रिचर्ड, गॅरी सोबर्स या दिग्गजांचा रैनाच्या संघात समावेश आहे. त्यांच्यासह युवराज सिंग, इयान बॉथम व अँड्य्रू फ्लिंटॉफही या संघात आहेत.
IND vs ENG 4th Test: जसप्रीत बुमराहाला दुखापत, आज गोलंदाजी नाही करू शकणार? Viral Video ने वाढवली टीम इंडियाची चिंतासुरेश रैनाने त्याच्या संघात चार फिरकीपटूंना प्राधान्य दिले आहे. यामध्ये महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्यासह हरभजन सिंग व अनिल कुंबळे या दोन भारतीय दिग्गजांसह पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकचा समावेश आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पॉल अॅडमचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उल्लेख खेला आहे.
'ब्रायन लारा, सचिन पाजी सलामीला येतील, रिचर्ड्स सर तिसऱ्या, सोबर्स चौथ्या, युवराज पाचव्या आणि बॉथम व फ्लिंटॉफ अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर खेळतील. मी शेन वॉर्न, हरभजन सिंग, अनिल कुंबळे व साकलेन मुश्ताक या चार फिरकीपटूंना निवडले आहे,'असे रैनाने सांगितले.
View this post on InstagramA post shared by Shefalii Bagga (@shefalibaggaofficial)
सुरेश रैनाची world XI: ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, व्हीव्ह रिचर्ड्स, गॅरी सोबर्स, युवराज सिंग, इयान बॉथम, अँड्य्रू फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, साकलेन मुश्ताक, इम्पॅक्ट प्लेअर - पॉल अॅडम्स
Kuldeep Yadav ला गंभीर-गिल संधी का देत नाही? टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा