पुणे : यू इन स्पोर्ट्सच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय फिडे १७०० पेक्षा कमी मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर प्रसाद खेडकर, केविन मथीयझागान, कश्यप खाखरिया, ईशान कदम, भूमिका वागले, अपर्णा गुप्ता, मुक्तानंद पेंडसेंसह एकूण ३४ खेळाडू तीन गुण मिळवून संयुक्तरित्या आघाडीवर आहेत.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलच्या मान्यतेने आळंदी येथील एम.आय.टी. अकादमी ऑफ इंजिनिअरिंग येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी सहसचिव राजेंद्र कोंडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे प्रकाश कुंटे होते. यावेळी मुख्य पंच प्रवीण ठाकरे, नागनाथ हलकुडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश रवंदळे यांनी केले तर आभार प्रा. श्रीधर खांडेकर यांनी मानले. या स्पर्धेत एकूण ४०२ खेळाडूंनी भाग घेतला आहे.
Chess Final: संयम विरुद्ध आक्रमकतेची पटावर लढाई; हंपी दिव्यामध्ये बुद्धिबळ जगज्जेतेपदाचा सामना, भारतीय खेळाडूंमध्ये आजपासून चुरस तिसऱ्या फेरीचे काही निकालसौभाग्यसिंग (२ गुण, उत्तर प्रदेश) पराभूत विरुद्ध प्रसाद खेडकर (३ गुण, महाराष्ट्र), द्रिश्य नाईक (२.५ गुण, महाराष्ट्र) बरोबरी विरुद्ध सार्थक शिंदे (२.५ गुण, महाराष्ट्र), केविन मथीयझागान (३ गुण, महाराष्ट्र) वि.वि. इम्रान हुसेन (२ गुण, रेल्वे), जितेंद्र वाळिंबे (२ गुण, महाराष्ट्र) पराभूत विरुद्ध कश्यप खाखरिया (३ गुण, महाराष्ट्र), ईशान कदम (३ गुण, महाराष्ट्र) वि.वि. रुतम मोहगावकर (२ गुण, महाराष्ट्र), स्वराज काळे (२ गुण, महाराष्ट्र) पराभूत विरुद्ध भूमिका वागले (३ गुण, महाराष्ट्र), रोनित मोटवानी (२ गुण, महाराष्ट्र) पराभूत विरुद्ध अपर्णा गुप्ता (३ गुण, महाराष्ट्र), पद्माकर करणकर (२ गुण, महाराष्ट्र) पराभूत विरुद्ध मुक्तानंद पेंडसे (३ गुण, महाराष्ट्र), गुरुबक्ष खन्ना (२ गुण, महाराष्ट्र) पराभूत विरुद्ध आर्य दिवम (३ गुण, मध्य प्रदेश), मयूर गुप्ता (२.५ गुण, महाराष्ट्र) बरोबरी विरुद्ध सर्वज्ञ बालगुडे (२.५ गुण).