Asia Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान सामना केव्हा?
GH News July 26, 2025 09:11 PM

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप स्पर्धेचा थरार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. मात्र त्यानंतरही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या स्पर्धेत दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देश पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 14 सप्टेंबरला खेळवण्यात येऊ शकतो. यंदा टी 20i फॉर्मेटने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मात्र याबाबत एसीसीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.