80151
80152
कोलकत्तावासीयांना कोकणची
चव चाखवू ः अमोल राऊळ
‘कोंकण फूड फेस्टिवल’चे आयोजन
कुडाळ, ता. २६ ः आम्हाला नेहमीच कोकण किनारपट्टीच्या चवींची आवड आहे. या महोत्सवातून आम्हाला आमच्या कोकण पाककृतीची ओळख नवीन पर्यटकांना आणि खाद्यप्रेमींना करून द्यायची आहे. कोकण कसा पर्यटनदृष्ट्या सक्षम आहे, हे जगाला दाखवून द्यायचे आहे, असे प्रतिपादन चिकित्सक समूहाच्या पाटकर-वर्दे महाविद्यालयाचे प्रमुख शेफ डॉ. अमोल राऊळ यांनी केले. ते चिकित्सक समूहाच्या पाटकर-वर्दे महाविद्यालय मुंबईतर्फे कोलकत्तावासीयांसाठी आयोजित ‘कोंकण फूड फेस्टिवल’मध्ये बोलत होते.
कोलकत्यातील पंचतारांकित हॉटेल जे डब्लू मॅरियट आणि चिकित्सक समूहाचे पाटकर- वर्दे महाविद्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ‘कोंकणी फूड फेस्टिव्हल’ आयोजित केले आहे. यात कोंकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये कोलकत्तावासीयांच्या पसंतीला उतरतील असे खास कोंकणातील प्रसिद्ध पदार्थ घावणे आणि काळ्या वाटण्याची उसळ, कोंबडी वडे, खेकड्याचे सार, तळलेले मासे, मोरी मटण, रसातील शिरवळे, पातोळी, उकडीचे मोदक, धोंडस आणि काजूचा मोहळ असे पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. पाटकर वर्दे महाविद्यालयाचे सेक्रेटरी डॉ. गुरुनाथ पंडित, चीफ एज्युकेशन ऑफिसर डॉ. माला खारकर यांच्या संकल्पनेतून हा फूड फेस्टिवल आयोजित केला आहे. महाविद्यालयाचे प्रमुख शेफ डॉ. राऊळ यांच्या मागदर्शनाखाली या फूड फेस्टिवलमध्ये पाटकर-वर्दे महाविद्यालयाचे शेफ आशिष राऊळ सहभाग घेणार आहेत. शेफ रहमान, शेफ धीराम हक, शेफ बगची, शेफ दास, शेफ हलीम, शेफ दिव्या भाटिया या सर्वांचे सहकार्य आहे.