स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात दीप अमावस्या साजरी
डोंबिवली, ता. २६ (बातमीदार)ः स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेतही उत्साहात दीप अमावस्या साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध आकार व प्रकारांचे दिवे आणले होते. शाळेतील शिक्षिका नीता पवार, वर्षा पाटील तसेच पालकांच्या मदतीने श्रावण महिन्यातील विविध सणांचे प्रतीकात्मक चित्र दर्शवणारी रांगोळी, विविध रंग, फुले व दिव्यांचा वापर करून काढण्यात आली होती. मुख्याध्यापिका मुणगेकर यांनी दीप प्रज्वलित करून दीपपूजन केले. सर्व विद्यार्थ्यांनी दीपआरती गाऊन पूजनात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना कथेच्या माध्यमातून दीप पूजनाचे महत्त्व सांगितले.