Blood Pressure : रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय
Marathi July 27, 2025 08:25 AM

धावपळीच्या युगात अनेकजण आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रासले आहेत. त्यापैंकी एक समस्या उच्च रक्तदाबाची ( High Blood Pressure) समस्या आहे. उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. पण, हळूहळू या समस्येचे रुपांतर गंभीर समस्येत होऊन हृदय, किडनी आणि मेंदूच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होत आहे. साधारणपणे, यावर उपाय म्हणून गोळ्या-औषधे घेतली जातात. पण, सतत गोळ्या-औषधे घेणे योग्य नाही. तुम्ही काही नैसर्गिक उपायांनी देखील उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता. जर तुम्हीही खूप दिवसांपासून गोळ्या-औषधांच्यामदतीने रक्तदाब नियंत्रित करत असाल किंवा नुकतंच तुम्हाला रक्तदाबाची समस्या सुरू झाली असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात जाणून घेऊयात औषधांव्यतिरिक्त नैसर्गिकरित्या रक्तदाब कसा नियंत्रित ठेवता येतो.

जेएनके फ्लो फोडडो खातो

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंक फूड खाणे बंद करावे. केवळ घरगुती पदार्थंच खावेत. तुम्ही आहारात संपूर्ण धान्य, फळे, भाज्या, कमी फॅट्स असणारे दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करू शकता.

चालण्याचा सराव करा –

कार, बाईक आल्याने मानव चालणं विसरत चालला आहे, असे म्हणणे चुकीचं ठरणार नाही. पण, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही चालण्याचा सराव दररोज करायला हवा. दररोज चालल्याने रक्तदाब नियंत्रणात राहील शिवाय आरोग्याच्या इतर समस्या कमी होतील.

कच्चा लसूण खावा –

लसूण केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी उपयुक्त असतो. रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कच्चा लसूण खाणे फायदेशीर ठरेल. यासाठी सकाळी दोन पाकळ्या लसणाच्या तुम्ही खाऊ शकता.

वजनावर कंट्रोल महत्त्वाचा –

लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे तुमचे तुमच्या वजनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. जर वजन कमी असेल तर रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=Lpz7vfeuida

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.