थोडक्यात :
झिम्बाब्वेमधील तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३ धावांनी पराभव केला.
अंतिम सामन्यातील शेवटचे षटक नाट्यमय ठरले.
शेवटच्या षटकात मॅट हेन्रीने ब्रेव्हिस व लिंड यांना बाद करत सामना न्यूझीलंडच्या बाजूने वळवला.
झिम्बाब्वेमध्ये नुकतीच तिरंगी टी२० मालिका पार पडली. या मालिकेच्या अंतिम सामन्यात शनिवारी (२६ जुलै) न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ धावांनी थरारक विजय मिळवला. हा अंतिम सामना हरारेमध्ये पार पडला. मॅच हेन्रीने गोलंदाजी केलेले शेवटचे षटक न्यूझीलंडसाठी महत्त्वाचे ठरले. तोच या सामन्यातील आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ६ बाद १७७ धावाच करता आल्या. लुआन-ड्रे प्रिटोरियसने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
ZIM vs SA, Test: पदार्पणाच्या कसोटीतच १९ वर्षीय प्रिटोरियसचा धुमाकूळ! द. आफ्रिकेसाठी दीडशतक ठोकत ६१ वर्षे जुना विक्रमही मोडलादक्षिण आफ्रिकेकडून लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि रिझा हेंड्रिक्स यांनी सलामीला खेळताना चांगली सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास १० च्या धावगतीने धावा करताना सलामीला ९२ धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी १० व्या षटकात मायकल ब्रेसवेलने लुआन-ड्रे प्रिटोरियसला ५१ धावांवर बाद करत तोडली.
त्यानंतर मात्र मधल्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पकड मिळवली होती. रिझा हेंड्रिक्सला १३ व्या षटकात ३७ धावांवर झॅकरी फोक्सने बाद केले. त्यानंतर कर्णधार रस्सी वॅन डर द्युसेन (१८) आणि रॉबिन हार्मनही (११) स्वस्तात बाज झाले. पण त्यांनंतर डेवाल्ड ब्रेव्हिसने जॉर्ज लिंडसह फलंदाजी करताना आक्रमक खेळ केला. त्यामुळे शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे ६ विकेट्स शिल्लक होत्या.
ब्रेव्हिस आणि लिंड शेवटच्या षटकात फलंदाजी करत होता. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री गोलंदाजी करत होता. त्याने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ब्रेव्हिसने पुल शॉट खेळला आणि त्यावेळी बाऊंड्री लाईनवर मायकल ब्रेसवेलने अफलातून झेल घेतला.
आधी त्याने चेंडू पकडला. पण नियंत्रण जाईल म्हणून त्याने चेंडू हवेत फेकला आणि बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाऊन परत मैदानात येत त्याने झेल घेतला. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी त्याला झेलबाद दिले. ब्रेव्हिस १६ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला.
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर ब्रेसवेलकडून कॉर्बिन बॉशचा झेल सुटल्याने त्याला जीवदान मिळाले. या चेंडूवर २ धावा निघाल्या. चौथ्या चेंडूवर बॉशला एकच धाव घेता आली. त्यामुळे २ चेंडूत ४ धावा असे समीकरण झाले होते.
मात्र पाचव्या चेंडूवर लिंडने चांगला शॉट मारल्यानंतरही डॅरिल मिचेलने त्याला अविश्वसनीय झेल घेतला. मिचेल त्याच्या उजवीकडे पळाला आणि त्याने डाईव्ह मारत त्याचा झेल घेतला. त्यामुळे लिंड १० धावांवर बाद झाला. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती, पण सेनुरन मुथूसामीला एकही धाव घेता आला नाही. त्यामुळे अखेर न्यूझीलंडने हा सामना ३ धावांनी जिंकला.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने २ विकेट्स घेतल्या, तसेच जेकॉब डफी, झॅकरी फोक्स, ऍडम मिलने आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळाला नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्डतत्पुर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने ४७ आणि रचिन रवींद्रने ४७ धावांची खेळी केली. तसेच टीम सिफर्टने ३० धावांची खेळी केली. डॅरिल मिचेल १६ धावांवर नाबाद राहिला, तर मायकेल ब्रेसवेलने १५ धावा केल्या.
दश्रिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना लुंगी एनगिडीने २ विकेट्स घेतल्या, तर नांद्रे बर्गर, क्वेना मफाका आणि सेनुरन मुथूसामी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
FAQs१. झिम्बाब्वेतील तिरंगी टी२० मालिकेचा अंतिम सामना कोणी जिंकला?
➤ झिम्बाब्वेतील तिरंगी टी२० मालिकेचा अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ३ धावांनी विजय मिळवला.
(Who won the final T20 match in Zimbabwe?)
२. तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यातील सामनावीर कोण ठरला?
➤ तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा मॅट हेन्री सामनावीर ठरला.
(Who was the Player of the Match?)
३. न्यूझीलंडकडून अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा कोणी केल्या?
➤ न्यूझीलंडकडून अंतिम सामन्यात डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रने प्रत्येकी ४७ धावा केल्या.
(Who scored the most runs for New Zealand?)
४. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण होता?
➤ अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून लुआन-ड्रे प्रिटोरियसने ५१ धावांची खेळी केली.
(Who was South Africa’s top scorer?)