पदवी प्रमाणपत्र हरवलंय? टेन्शन घेऊ नका, असं मिळवा डुप्लिकेट प्रमाणपत्र
Tv9 Marathi July 27, 2025 12:45 PM

जर तुमची ग्रॅज्युएशनची डिग्री हरवली असेल, चोरीला गेली असेल किंवा कुठे ठेवून विसरली असेल, तर चिंता करण्याचं कारण नाही. ही डिग्री तुमचं शिक्षण पूर्ण केल्याचं एक महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे, जी हायर एज्युकेशनसाठी किंवा नोकरीच्या अर्जात आवश्यक असते. अशा वेळी डुप्लिकेट डिग्री मिळवण्यासाठी काही सोप्या पण आवश्यक फॉर्मॅलिटीज फॉलो कराव्या लागतात.

सर्वात पहिले काम म्हणजे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर (FIR) दाखल करा. तुमची डिग्री हरवली आहे हे अधिकृतरित्या सिद्ध करण्यासाठी एफआयआरची कॉपी खूप महत्त्वाची आहे. ही कॉपी पुढे युनिव्हर्सिटीमध्ये सादर करावी लागते. एफआयआर झाल्यावर, शपथपत्र (Affidavit) तयार करावं लागतं. हे शपथपत्र नोटरीकडून करून घ्यावं लागेल ज्यात तुमचं नाव, कोर्स, युनिव्हर्सिटीचं नाव आणि डिग्रीचं वर्ष यासारखी माहिती असावी.

यानंतर, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा विभागाशी संपर्क करा. आजकाल अनेक कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज डुप्लिकेट डिग्रीसाठी ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज घेतात. यासाठी युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा परीक्षा विभागाशी थेट संपर्क साधा. तेथून तुम्हाला अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि फी याबाबत सविस्तर माहिती मिळेल.

1. डुप्लिकेट डिग्रीसाठी खालील डॉक्युमेंट्स लागतील

2. एफआयआरची कॉपी

3. शपथपत्र

4. मार्कशीटची कॉपी (जर उपलब्ध असेल)

5. आधार, पॅन कार्डसारखा ओळखपत्र

6. पासपोर्ट साइज फोटो

7. ठरलेली फी (डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाइन पेमेंट)

डुप्लिकेट डिग्री मिळवण्याची फी युनिव्हर्सिटीवर अवलंबून असते. ती साधारणतः 500 ते 5000 रुपयांदरम्यान असते. वेळेच्या बाबतीतही प्रत्येक युनिव्हर्सिटी वेगवेगळी आहे काही ठिकाणी 15 दिवसांत तर काही ठिकाणी काही महिन्यांत मिळते. अर्ज केल्यानंतर, युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवरून किंवा ऑफिसमध्ये जाऊन अर्जाची स्थिती वेळोवेळी चेक करत राहा.

डुप्लिकेट डिग्रीसाठी काही आवश्यक सूचना

1. डिग्री हरवल्याची माहिती मिळताच लगेचच ही प्रक्रिया सुरू करा. उशीर केल्यास अडचण येऊ शकते.

2. तुमची सर्व मार्कशीट्स, सर्टिफिकेट्स यांची डिजिटल आणि फिजिकल कॉपी सुरक्षित ठेवा.

3. युनिव्हर्सिटीचे नियम आधी नीट वाचा. प्रत्येक संस्थेचे वेगळे नियम असतात.

4. जर युनिव्हर्सिटी ऑनलाइन सुविधा देत असेल (उदा. दिल्ली युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, IGNOU), तर ती वापरा.

5. कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाकडे जाऊ नका, फक्त अधिकृत चॅनेलद्वारेच अर्ज करा.

डिग्रीची तातडीने गरज असेल तर काय करावं?

जर तुम्हाला नोकरी किंवा हायर एज्युकेशनसाठी तात्काळ डिग्री लागणारी असेल आणि डुप्लिकेट मिळायला वेळ लागणार असेल, तर तुम्ही युनिव्हर्सिटीकडून मिळालेलं Provisional Certificate किंवा Final Year Marksheet वापरू शकता. अनेक संस्थानं हे डॉक्युमेंट्स चालवून घेतात किंवा मूळ डिग्री सादर करण्यासाठी वेळ देतात. याशिवाय, डिग्री व्हेरिफिकेशन लेटरसुद्धा युनिव्हर्सिटीमधून मिळवता येतं, जे तुमचं शैक्षणिक पात्रता सिद्ध करतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.