अंडे: राज्यातील शेतकऱ्यांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची लवकरच गच्छंती होण्याची शक्यता असताना ‘ माणिकराव कोकाटे हा स्पष्टवक्ता माणूस आहे. बोलताना आपली मतं खुलेपणाने मांडतात. जरी चुकीच्या पद्धतीने बोलत असतील तरी ती त्यांची भाषा आहे .त्यांच्या मनात काही नसतं ‘ असं म्हणत बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली आहे. तर दुसरीकडे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं तर शुभेच्छा .त्यांना बीडचा पालकमंत्री पद द्यावं, आणखी मोठी संधी मिळावी असंही म्हटलंय .
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मंत्रिपदावरून त्यांची गच्छंती होण्याची चर्चा आहे . याबाबत मंगळवार पर्यंत निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे .यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं,’ कोकाटे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत .मी त्यांना जवळून ओळखतो .मागच्या 30-35 वर्षांपासून आमचा संबंध आहे .अतिशय स्पष्ट वक्तामाणूस आहे . बोलताना त्यांची जी काही मतं आहेत ती खुलेपणाने मांडणारा माणूस आहे .त्यामुळे जरी काही चुकीच्या पद्धतीने ते बोलत असतील तरी त्यांची ती भाषा आहे .मागच्या पाच सहा महिन्यांमध्ये कृषी खात्यामध्ये जो काही गोंधळ मागच्या काळात झाला, फक्त पिक विमा चा बाबतीत असेल किंवा बदल्यांच्या बाबतीत असेल .आज कृषी खात्यातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांना विचारलं तर कृषी खात्यात कोणताही गैरव्यवहार न करणाऱ्या मंत्रांमध्ये ते कृषी मंत्री कोकाटे यांचे नाव घेतात . बदल्यांची पद्धत .अतिशय पारदर्शक पद्धतीने करणारा आणि कृषी खात्यात शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांविषयी कणव असणारा माणूस आहे . माध्यम राईचा पर्वत करत आहेत . सभागृहात पाच – पाच सहा – सहा तास मंत्र्यांना बसावं लागतं .त्या काळात आम्ही सुद्धा फोन उचलतो .आपापसात चर्चा करतो .कधी व्हाट्सअप बघतो .हेच नेमकं चित्रण झालं तर प्रत्येकाची अडचण होणार .’ असं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले .
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर दुसरीकडे माझी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी साहित्याच्या खरेदी वरून होणाऱ्या आरोपांना न्यायालयाने दिलासा दिलाय . दरम्यान आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा आहे . यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर त्यांना शुभेच्छा दिल्यात .धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावं .ते बीड जिल्ह्यातले आहेत .माझ्यापेक्षा लहान आहेत .त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचा काम करेन असं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले .बीडमध्ये सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे खून प्रकरण चर्चेत आहे .21 महिन्यानंतरही या प्रकरणातील आरोपी फरार आहेत . काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे जवळचे पाठीराखे बाळा बांगर यांनी महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे केले होते . यावरून या प्रकरणाचा तपास करावा असं ही त्यांनी सांगितलं .
आणखी वाचा