मोरबे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ
esakal July 28, 2025 12:45 AM

मोरबे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ
७८.३० टक्के धरण भरले
वाशी, ता. २७ (बातमीदार) ः पावसामुळे मोरबे धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी ही ८३.५४ मीटर झाली असून, ७८.३० टक्के धरण हे भरलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईत १९ मार्च २०२६ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
नवी मुंबईच्या मोरबे धरणात मागील वर्षी पाण्याची पातळी ही २७ जुलै रोजी ८२.९० मीटर होती, तर धरणात ७५.५० टक्के पाणीसाठा शिल्लक होता, पण यंदा मोरबे धरणाची पाणीपातळी ही ८३.५४ मीटर इतकी असून, आता ७८.३० टक्के भरलेले आहे. मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ८८ मीटर इतका पाणीसाठा लागतो. मोरबे धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. १९ मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.