Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग
Saam TV July 28, 2025 04:45 PM
Nagpur: नागपूर मनपाचा झोन कार्यलयातून नस्ती चोरून नेल्याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल

- राजेश रंगारी असे कंत्राटदाराचे नाव, गुन्हा दाखल.

- लक्ष्मीनगर झोन कार्यालयातून कामकाजाशी संबंधित नस्ती चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार...

- लक्ष्मीनगर झोनचे सहायक अभियंता अभिजित नैताम यकार्यालयात नसताना महापालिका कंत्राटदार राजेश रंगारी आणि सहकारी यांनी १५ फाईल घेऊन गेलेत.

- विशेष म्हणजे महापालिका कर्मचारी रघुवीर जांगडे यांनी रंगारी यांना अडविले असता, अरेरावी केली. त्यानंतर अनिकेत रंगारीला फाईल देऊन ते निघून गेले.

Pune: पुण्यात कंटेनरला भीषण आग

पुणे-सातारा महामार्गावरून जात असलेल्या कंटेनरला भीषण आग

कंटेनरच्या आगीने परिसरात मोठे धुराचे लोण

पुण्यातील जांभुळवाडी पुलाजवळ ही घटना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली

अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गाची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवले गेले

Khadakwasla: खडकवासाला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवणार

सकाळी आठ वाजता २२ हजार १२१ क्युसेक्स वेगाने पाणी सोडणार

धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने विसर्ग वाढवला

यंदाच्या मोसमातील सर्वात जास्त विसर्ग होणार आहे

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू

Shravan: बारावे ज्योतिर्लिंग 'घृष्णेश्वर" मंदिरात भाविकांची गर्दी

श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या सोमवारी सर्वच शिव मंदिरात भक्तांची गर्दी होते. १२ ज्योतिर्लिंग यात्रेत महत्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेल्या वेरूळच्या 'घृष्णेश्वर' मंदिरात भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी पाहायास मिळाली. मंदिर विश्वस्तांनी भाविकांसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांमधील एकुण पाणीसाठा ५१ टक्के

धाराशिव जिल्ह्यात तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाने सर्व दूर हजेरी लावली.हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढीवर अद्याप फारसा परिणाम झालेला नाही या पावसामुळे मागील आठवडाभरात किरकोळ म्हणजे ०.७५० दशलक्ष घनमीटरने ०.३१ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. सध्या एकूण पाणीसाठा ४९.६० टक्के आहे.पाणीसाठा वेगाने वाढण्यासाठी आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील 226 प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ५१ टक्के तर उपयुक्त साठा ४२.२३ टक्क्यांवर आहे.

Nagpur: मेट्रो स्थानकांपासून बसेसची मूलभूत कनेक्टिव्हिटी या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा...

- सुमारे २५ हजार ५६७कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला अधिक लोकाभिमुख करून सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश.

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह आमदार जिल्हा प्रशासनातील तसेच महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित ,

- नागपूर महानगराच्या विकासासह ऊर्जेची निर्मिती करणारे दोन मोठे प्रकल्प आणि काही खाणी कोराडी, कामठी, कन्हान, खापरखेडा परिसरात आहेत.

Pune Dam Level: पुण्यातील जवळपास सर्व धरणं ९० टक्के भरले

पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणे मिळून ९१ टक्के पाणीसाठा

मागील वर्षी आजच्या तारखेपेक्षा ९ टक्के जास्त पाणीसाठा

खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू

पुण्याला पाणी पुरवठा करणारे चार धरणे मिळून २६.६३ टी एम सी पाणी

Shivsena: शिवसेना शिंदे गटाच्या विरोधकांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी

० रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

० सुधाकर घारे यांच्या जिल्हाध्यक्ष तर हनुमन जगताप प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

० आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याचा राष्ट्रवादीचा डाव

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने आखला असून त्या नुसार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडचे जिल्हाध्यक्ष पद शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे विरोधक आणि कर्जतमधून अपक्ष निवडणूक लढवणारे सुधाकर घारे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर मंत्री भरत गोगावले यांचे विरोधक हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी

- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी

- श्रावणातील पहिलाच सोमवार असल्यानं भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी केली गर्दी

- श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे त्रंबकेश्वराची विधिवत पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर मंदिर पहाटे चार वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं

- श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक सजावट

- श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ४ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार

- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ब्रम्हा विष्णू आणि महेश याचा वास असल्याने श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व

राज ठाकरेंचे नेतृत्वाखाली लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडणार - मनसेच्या कंत्राटदार संघटनेचा इशारा.

सांगलीच्या तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येची मनसेकडुन देखील दखल घेण्यात आली आहे.हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची मुंबईतील मनसेचे नेते व कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तांदुळवाडी मध्ये भेट घेत असताना केले आहे.राज ठाकरे यांच्याकडून हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होती, त्यानुसार भेट घेण्यात आली होती, लवकरच कंत्राटदारांची थकीत देणे आणि हर्षल पाटील आत्महत्या बाबत राज ठाकरेंची भेट घेऊन महाराष्ट्रभर कंत्राटदारांच्या थकीत बिलाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल,असं मनसेच्या अभियंता व कंत्राटदार संघटनेकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.

कृष्णा नदीच्या पात्रात रंगल्या होड्यांच्या शर्यती

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यती पार पडल्या.अत्यंत चुरशीने दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात होडयांच्या शर्यतीचा थरार रंगला होता.दरवर्षी श्रावण मास निमित्ताने या होड्यांच्या शर्यती कृष्णा नदी मध्ये पार पडतात.केशवनाथ मंडळाच्यावतीन या होड्यांच्या शर्यतेचा आयोजन करण्यात आलं होतं.ज्यामध्ये सांगलीसह परिसरातील सुमारे 15 हून अधिक होडी चालक संघांनी सहभाग घेतला होता.दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात ढोल-ताशांच्या निनादात रंगलेल्या होड्यांचा थरार पाहण्यासाठी नदीकाठावर सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती.

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त औंढा नागनाथ शिवमंदिर भक्तांनी दुमदुमले

देशभरात श्रावणी सोमवार निमित्त शिव मंदिरांमध्ये शिवभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला आहे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळालं शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले दरम्यान आज दिवसभरात दोन लाखांपेक्षा अधिक भाविक औंढा नागनाथ शहरात दाखल होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली असून यासाठी पोलीस प्रशासनासह मंदिर संस्थांन कडून चोख व्यवस्था केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब - मोदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणे ही केवळ महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमात केले. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पैठण तालुक्यातील पैठणी निर्मिती उद्योग चालविणाऱ्या कविता ढवळे यांच्या कामाचेही कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात म्हणाले की, आपल्या सर्वांना अभिमान वाटावा, अशी बातमी युनेस्कोकडून आली आहे. युनेस्कोने मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ‘ म्हणून मान्यता दिली आहे. या प्रत्येक किल्ल्याच्या इतिहासाचे एक - एक पान जोडले आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. साल्हेरच्या किल्ल्यामध्ये मुघलांचा पराभव झाला होता. शिवनेरी, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही किल्ले असे आहेत की, त्यांना जिंकणे शत्रूला शक्य झाले नाही. खांदेरीचा किल्ला तर समुद्रामध्ये बनविण्यात आलेला अद्भूत किल्ला आहे. हा किल्ला तयार होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी राजांना रोखण्याचे अनेक प्रयत्न शत्रूंकडून झाले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रतापगडच्या किल्ल्यामध्ये अफजल खानाला पाणी पाजले होते. विजयदुर्ग या किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे होते. छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते, याचे प्रमाण या किल्ल्यामध्ये सापडते. काही वर्षांपूर्वी मी रायगड ला गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील पुतळ्यासमोर मी नतमस्तक होऊन वंदन केले होते. त्यावेळी आलेल्या अनुभूतीचा क्षण अगदी आयुष्यभरासाठी माझ्या मनामध्ये कोरला गेला, असो मोदी म्हणाले.

एक्सप्रेसच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू

- सोलापुरात गोलघुमट एक्सप्रेसच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

- सोलापुरात रेल्वेच्या धडकेत दोन नागरिकांचा मृत्यू तर एक जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती

- सोलापूर जिल्ह्यातील माढा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर घडली घटना

- रेल्वेच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तर एका व्यक्तीला उद्यान एक्सप्रेस ने उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात करण्यात आले दाखल

- गोलघुमट एक्सप्रेस पंढरपुरातून सोलापूरकडे येत असताना घडली घटना

- विजय कैय्यावाले, राहुल अशोक बेंजरपे अशी रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

ठाकरे बंधू एकत्र, मुख्यमंत्री काय म्हणाले ?

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्रमहाराष्ट्रातल्या मनातलं काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही दिसेल. मात्र काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असे म्हणणे योग्य नाही.. हे फार मोठे स्टेटमेंट होईल... खडसेंना टोला, मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

एकनाथ खडसेंना माहिती असेल की आपले जावई काय करतात असा त्यांना अंदाज असेल

जर षडयंत्र असेल तर हे सहन करणार नाही असे एकनाथ खडसे म्हटले होते यावर मंत्री गिरीश महाजन म्हटले. एकनाथ खडसे कायम विरोधात असतात हे सहन करतच नाही.

खरं आहे एकनाथ खडसे हे सहनही करत नाही असा मिश्किल टोला मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे. एकनाथ खडसे यांनी माझ्या संपत्ती बाबत माहिती काढावी मुंबई पुण्यात कुठे माझी संपत्ती आहे आज ऑनलाईन सर्व मिळतं मी त्यांना सर्वे उतारे काढून देतो . पाच वेळा काय दहा वेळा माझ्या संपत्तीची चौकशी करावी . एकनाथ खडसेंच्या संपत्तीची चौकशी केल्यानंतर आपल्याला माहितीच असेल काय झाला आहे खडसे हा अध्याय माझ्यासाठी आता संपला आहे

आमदार मंगेश चव्हाणएकनाथ खडसेच्या जावयांना अडकवण्याचे षडयंत्र असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत उभी राहील. त्यांचा जावई जर आयासबाज असेल तर आपल ते भावड लोकांचं ते खवड हे बोलणं त्यांनी सोडावं त्यांचा हा नियमित ठरलेला उपक्रम असेल सोमवारी कुठे जायचंय मंगळवारी कुठे जायचंय कुठल्या बारची उधारी बाकी आहे त्यानेच टिप दिली असावी. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने बनावट टेलिग्राम अकाउंट

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने बनावट टेलिग्राम अकाउंट तयार केल्याचा प्रकार समोर आलाय.. खुद्द प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिलीये.. आंबेडकर यांच्या नावाने बनावट टेलिग्राम अकाउंट तयार करून अनेकांना लिंक पाठवली जात आहे. 'कृपया कोणीही ती लिंक ओपन करू नये', अन्यथा तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केल आहे.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

सह्याद्रीच्या डोंगरावर चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगररांगा, त्यावर पांढऱ्या शुभ्र धुक्यांची चादर, अशा निसर्गरम्य वाचावरणात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिर या मंदिर परिसरात महादेवाच्या भक्तांचा महासागर लोटलाय या निमित्ताने गाभारा आणि सभामंडप विविध फुलमाळांनी सजवण्यात आले असून, पहाटेपासूनच हजारो भाविक मोठ्या भक्तीभावाने उपासना करत आहेत.

भिमाशंकरला पहिला सोमवारी भाविकांची गर्दी

आज पहिल्या सोमवारी पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करुन महाआरती शंखनाद करण्यात आला यावेळी भिमाशंकरच्या मंदिर आणि मुख्य गाभारा विविध फुलमाळांनी सजावट करण्यात आली दरम्यान हर हर महादेव, ओम नम शिवाय च्या जयघोषात महादेवाची नगरी दुमदुमुन गेली असुन श्रावणातील प्रत्येक सोमवार हा विशेष असतो, पण पहिल्या सोमवारी इथं येण्याचं वेगळंच महत्व असतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.