ऋतुजा बागवे बिझनेसवुमन झाली आहे.
ऋतुजा बागवेने मुंबईत स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
ऋतुजाच्या नवीन रेस्टॉरंटचे उद्घाटन अभिनेता सुबोध भावे याने केले.
मराठी कलाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठमोळी अभिनेत्री आता बिझनेसवुमन झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आहे. ऋतुजा नुकतेच स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट करून तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
View this post on InstagramA post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)
ऋतुजाबागवेच्या नवीन रेस्टॉरंटचे उद्घाटन मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यांचा हातून करण्यात आले. ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर एक रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर एक रेस्टॉरंटसोबत सुंदर फोटो टाकला आहे. या फोटोला तिने खास कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं आहे की, "तुम्हा सर्वांच्या प्रेमावर विश्वास ठेवून, माझ्या माणसांना घेऊन, नव्या व्यवसायात पुढचं पाऊल टाकतेय…नक्की भेट द्या..! आम्ही आदरातिथ्यासाठी वाट पाहतोय."
ऋतुजाच्या या नवीन इनिंग पाहून चाहते आणि मित्रमंडळी तिचे कौतुक करत आहे आणि नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत आहेत. ऋतुजाच्या नवीन कोऱ्या रेस्टॉरंटचे नाव 'फूडचं पाऊल' (Foodch Paool) असे आहे. हे व्हेज- नॉनव्हेज रेस्टॅारंटआहे. ऋतुजाचे नवीन रेस्टॅारंट मखवाना रोड, मरोळ, अंधेरीपूर्व येथे आहे.
View this post on InstagramA post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)
ऋतुजाने रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला पारंपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाची सुंदर साडी तिने नेसली होती. मॅचिंग ज्वेलरी आणि केसात गुलाबाची फुल माळून तिने हा लूक पूर्ण केला होता. ऋतुजाने आजवर अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. ऋतुजाची 'नांदा सौख्यभरे' ही मराठी मालिका खूप गाजली. तिने नाटक, चित्रपट, मालिका आणि सीरिजमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?
ऋतुजा बागवेने कोणता व्यवसाय सुरू केला?
नवीन रेस्टॉरंट उघडले
ऋतुजा बागवेच्या नवीन रेस्टॉरंटचे नाव काय?
फूडचं पाऊल
ऋतुजा बागवेच्या नवीन रेस्टॉरंटचे लोकेशन काय?
अंधेरी, मुंबई
ऋतुजा बागवेची गाजलेली मालिका कोणती?
नांदा सौख्यभरे