Ahilyanagar breaking news : अहिल्यानगरमधील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील तब्बल ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार, पाच बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक, अवाजवी नोकर भरती, अशा सर्व आरोपांचा चौकशी सुरू असताना, देवस्थान ट्रस्टचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांचा मृत्यूच्या बातमी शनिशिंगणापूर हादरलं आहे.
उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे राहत्या घरात गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेत, चौकशी सुरू केली आहे. घोटाळ्याची चौकशी सुरू असताना, नितीन शेटे यांच्या अशा प्रकाराने मृत्यूने वेगवेगळ्या चर्चाना तोंड फुटले आहे.