नाथाभाऊंच्या जावयाबद्दल हॅकरचा खळबळजनक दावा, रेव्ह पार्टीच्या अगोदर फोन, पुराव्यासह…
Tv9 Marathi July 29, 2025 09:45 AM

एकनाथ खडसे यांची लेक रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी करताना रंगेहात पुणे पोलिसांनी पकडले. पुण्यातील खराडी भागात एक रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली, त्यावरून छापेमारी करत पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. आता यावरून राजकारणात मोठा भूकंप आलाय. या प्रकरणात अत्यंत मोठा दावा करण्यात आला. एकनाथ खडसे हे देखील पुण्यात दाखल झाले असून त्यांनी थेट संशय व्यक्त करत काही आरोप केले.

प्रांजल खेवलकर याला अडकवण्यासाठी कट रचल्याचा दावा 

आता पुण्यातील या रेव्ह पार्टीबद्दल एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी खळबळजनक दावे केले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आल्याचे दिसतंय. हॅकर मनीष भंगाळे यांनी पुण्यातील रेव्ह पार्टीबद्दल बोलताना म्हटले की, खडसेंच्या जावयाचा आणि या पार्टीचा दूरपर्यंत काहीच संबंध नाही. उलट त्यांनाच फोन करून या पार्टीच्या ठिकाणी बोलवण्यात आले.

हॅकर मनीष भंगाळे यांच्या दाव्याने मोठी खळबळ 

प्रांजल तिथे पोहोचताच बरोबर छापेमारी करण्यात आली. त्यांनी असा दावा देखील केला आहे की, या प्रकरणातील ज्याकाही तांत्रिक बाबी आहेत, त्या माझ्यासमोर आल्या आहेत. माझ्याकडे जेवढी माहिती आहे आणि मी जेवढे काही तपासले, त्यावरून एक गोष्ट नक्की आहे की, हा सर्व ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे. त्यासा तिथे बोलावण्यात आले आणि जाळ्यात ओढण्यात आले, बाकी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

खरोखरच फोन करून प्रांजल यांना बोलावले? 

पुढे बोलताना धक्कादायक खुलासा करत प्रांजल हे पार्टीतील लोकांना ओळखत नाहीत किंवा त्यांचा संबंध देखील नसल्याचे भंगाळे यांनी स्पष्ट केले. एक गोष्ट नक्की आहे की, प्रांजल यांच्याविरोधात सर्वकाही कट रचला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रोहिणी खडसे यांनीही न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते. आज रोहिणी खडसे या पोलिस आयुक्तांची भेट घेणार होत्या, मात्र, त्यानंतर ही भेट अचानक रद्द करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.