नगर जिल्ह्यातील 'या' वाड्यात आहे शिवरायांच्या चुलत आजोबांची तलवार
esakal July 29, 2025 12:45 AM
Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword भांबोरकर वाडा

नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील भांबोरे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांच्या वंशजांचा ऐतिहासिक वाडा आहे.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword सध्याची स्थिती

सध्या या वाड्याची काही प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र, त्याचे अवशेष आजही आहे. ते इतिहासाची साक्ष देतात.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword चुलत आजोबांची तलवार

विठोजीराजे यांचे वंशज प्रवीणजी भोसले यांच्याकडे 'भांबोरकर भोसले दफ्तर' हे दुर्मिळ पुस्तक आणि एक तलवार आहे.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword पराक्रम

मालोजीराजे आणि विठोजीराजे हे बंधू वणगंपाळ निंबाळकरांकडे चाकरी करीत होते. कोल्हापूर प्रांतातील स्वारीत त्यांनी पराक्रम गाजवला होता.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword निजामशाहीतील योगदान

मालोजी आणि विठोजी यांनी निजामशाहीत मलिक अंबरला पाठिंबा दिला. त्यांना १५०० मनसबदारी आणि जुन्नर परगणा मिळाला होता.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword मालोजीराजेंचा मृत्यू

इ.स. १६०६-०७ मध्ये इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी तिथेच आहे.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword विठोजीराजे यांचे वंशज

विठोजीराजे यांचा सहावा पुत्र परसोजीराजे यांचे वंशज भांबोरे आणि नांदनज येथे राहतात. परसोजी यांनी वऱ्हाड, खानदेशात बंडखोरांचा बंदोबस्त केला होता.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword खेलोजीराजे आणि स्वराज्य

परसोजी यांचे पुत्र सयाजी आणि त्यांचे वंशज खेलोजीराजे यांनी छत्रपती शाहूमहाराजांच्या सेवेत स्वराज्यात योगदान दिले.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword अप्पाजीराजे यांची आख्यायिका

खेलोजीराजे यांचे वंशज अप्पाजीराजे हे रागीट, बलवान आणि धाडसी होते. गाईंची झुंज सोडवण्याच्या प्रसंगामुळे त्यांच्याबद्दल आख्यायिका प्रचलित आहे.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword भोसले घराण्याचा वारसा

भांबोरकर भोसले घराण्याचा आजही जपला जातो आहे. पुरातन तलवार आणि दफ्तर भांबोरे येथील वाड्यात जतन करण्यात आले आहेत.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi शिवरायांच्या काकींचा वाडा! आजही 'या' गावात राहतात छत्रपतींचे वारसदार हेही वाचा -
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.