सांगली : शहरातील कंत्राटदारास हत्याराचा धाक दाखवत पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असलेल्या कुख्यात गुंडास चार तासांत शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. महेंद्र ऊर्फ बाळू वसंत भोकरे (वय ५०, रा. भुईराज सोसायटी, गणेशनगर) असे त्याचे नाव आहे. काल रात्री उशिरा ही कारवाई केली. दरम्यान, भोकरे यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँकपोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशनगर अजय लोखंडे कंत्राटदार आहेत. रोटरी हॉल येथे मॉर्निंग वॉक ट्रॅकचे काम करण्याचे कंत्राट त्यांच्याकडे आहे. त्याठिकाणी त्यांचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास गुंड भोकरे साथीदारांसह तेथे आला. लोखंडे यांचे काम रामलखन पासवान यांच्याकडे पाहून आरडाओरडही केली. हे कोणाचे आहे, येथे कोणी काम करायचे नाही, असे म्हणत कामगार पासवान यांच्या अंगवार धावून गेले.
दरम्यान, कंत्राटदार लोखंडे मध्यस्थी करण्यासाठी गेले त्यावेळी गुंड भोकरे याने एडक्यासारख्या हत्याराने दमबाजी करत काम बंद करण्यास सांगितले. काम बंद केले नाही, तर जेसीबी आणि ट्रॅक्टर फोडून टाकण्याची, तसेच काम सुरू करण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्यावी लागेल; अन्यथा काम सुरू केल्यास जीवे मारीन, अशी धमकी गुंड भोकरे याने दिली. त्यानंतर कंत्राटदार लोखंडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.
Success Story: शंकरबाबांची दृष्टिहीन कन्या माला झाली सरकारी अधिकारी; दत्तक कन्येला वडिलांचे नावच नाही, ममत्वही मिळालंपोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काल रात्रीच छापेमारी करत भोकरे यास ताब्यात घेतले. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, दिग्विजय साळुंखे, योगेश सटाले, विशाल कोळी, संदीप कोळी, योगेश हक्के यांचा समावेश होता.