मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखत भारताने पराभव टाळला.
केएल राहुल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या दमदार खेळाने भारतासाठी हा सामना वाचवला.
पण या सामन्याच्या अखेरीस जडेजा आणि स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यावर आर अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.
मँचेस्टरला इंग्लंडविरुद्ध झालेला चौथा कसोटी सामना भारताने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. पराभवाची टांगती तलवार डोक्यावर असताना शेवटच्या दोन दिवसात केएल राहुल, कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार कामगिरी करत हा सामना अनिर्णित राखला.
मात्र सामन्याच्या अखेरीस या नाट्यमय घटना घडली. त्यावर आर अश्विननेही प्रतिक्रिया दिली असून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला त्याने खडेबोल सुनावले आहेत.
ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकंझाले असे की इंग्लंडने या सामन्यात ३११ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. भारताने पहिल्या दोन विकेट्स यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या रुपात पहिल्याच षटकात गमावल्या होत्या. पण नंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी १८८ धावांची भागीदारी केली.
पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात केएल राहुल ९० धावांवर आणि शुभमन गिल १०३ धावांवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी केली. जडेजा १०७ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर १०१ धावांवर नाबाद राहिला. जडेजा आणि सुंदर यांनी पाचव्या दिवसाचे शेवटचे दोन्ही सत्र खेळून काढल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
दरम्यान, सामना संपण्याच्या काही क्षण आधी जडेजा आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात शाब्दिक चकमक घडली होती. झाले असे की सामना अनिर्णित राहिल, हे स्पष्ट झालं होतं अशावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स जडेजाकडे खेळ संपण्याबाबत विचारण्यासाठी आला.
त्यावेळी जडेजा आणि सुंदर दोघेही शतकांच्या अगदी जवळ होते. त्यामुळे त्यांनी त्याला नकार दिला. इंग्लंडचा संघाने १३५ षटकांहून अधिक काळ क्षेत्ररक्षण केलेलं होतं, त्यामुळे ते वैतागले होते आणि हा खेळ थांबवू इच्छित होते कारण निकाल अनिर्णितच राहणार होता.
यावेळी जडेजाने त्यावेळी खेळ थांबवण्यास नकार दिल्याने बेन स्टोक्स वैतागला होता. त्याने जडेजाला स्लेजिंग करताना असंही म्हणाला की तुला हॅरी ब्रुकविरुद्ध खेळून शतक करायचं आहे का? ब्रुक इंग्लंडचा फलंदाज असून फार क्वचित गोलंदाजी करताना दिसतो.
स्टोक्सच्या या कृतीवर क्रिकेटविश्वातून टीका होत आहे. अशातच आता आर अश्विनही त्याच्यावर भडकला आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात अश्विन त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलाताना दिसत आहे की 'तुम्ही डबल स्टँडर्ड हा शब्द ऐकलाय का? त्यांनी तुमच्या (इंग्लंडच्या) सर्व गोलंदाजांचा सामना केलाय, तुमच्यावर ते वरचढ ठरलेत आणि ते आता शतकाच्या जवळ असताना तुम्हाला खेळ थांबवायचा आहे? त्यांनी काय खेळ थांबवायचा?'
'तू (स्टोक्स) त्याला (जडेजा) विचारतोस की तुला हॅरी ब्रुकच्या विरुद्ध शतक करायचं का? ब्रुक नाही रे भावा, त्याला शतक करायचं आहे. कोणताही गोलंदाज घेऊन ये, ब्रुकला गोलंदाजी देण्याचा तुझा निर्णय आहे, आमचा नाही.'
IND vs ENG 4th Test : वॉशिंग्टन सुंदरवर एवढाच विश्वास असेल तर...! R Ashwin ने चौथ्या कसोटीसाठी गौतम गंभीरला दिला सल्लाअश्विन पुढे म्हणाला, 'तिथे दोन कारणं होती त्याला (स्टोक्स) त्याच्या मुख्य गोलंदाजांना आणखी दमवायचे नव्हते, हे ठीक आहे. पण दुसरं कारण म्हणूजे तू वैतागला होता आणि विचार केला की तू खूश नाही, तर बाकीच्यांनी पण असू नये. असं क्रिकेट नसतं रे. कसोटी क्रिकेटमधील त्या धावा होत्या. शतक करण्यासाठी मेहनत लागले, ते भेट म्हणून मिळत नाही. वॉशिंग्टन आणि जडेजा त्यासाठी पात्र होते. '
दरम्यान, हा सामना अनिर्णित राहिल्याने आता चार सामन्यांनंतर मालिकेत इंग्लंड २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. आता पाचवा सामना निर्णायक आहे. मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडला पाचव्या सामन्यात विजय मिळवावा लागेल किंवा सामना अनिर्णित ठेवावा लागेल. तसेच भारताला आता मालिका जिंकण्याची संधी नाही, पण मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला पाचव्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे.
FAQsप्रश्न १: भारत - इंग्लंडमधील मँचेस्टर कसोटी सामना कोण जिंकले?
(Who won the Manchester Test match?)
उत्तर: भारत - इंग्लंडमधील मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राहिला.
प्रश्न २: मँचेस्टर कसोटीत जडेजा आणि स्टोक्समध्ये काय वाद झाला?
(What was the argument between Jadeja and Stokes?)
उत्तर: मँचेस्टर कसोटीत स्टोक्सने सामना थांबवण्याचा प्रस्ताव दिला, पण जडेजा आणि सुंदर शतकाच्या जवळ होते, म्हणून त्यांनी नकार दिला.
प्रश्न ३: आर अश्विनने स्टोक्सबाबत काय प्रतिक्रिया दिली?
(What did Ashwin say in response?)
उत्तर: अश्विनने स्टोक्सवर ‘डबल स्टँडर्ड’ असल्याची टीका करत त्याच्या वागण्यावर आक्षेप घेतला.
प्रश्न ४: पाचवा कसोटी सामना कधी आणि कुठे होईल?
(When and where will the 5th Test be played?)
उत्तर: वेळापत्रकानुसार, पाचवा आणि अंतिम सामना लंडनमधील केनिंगटन ओव्हलवर ३१ जुलैपासून सुरू होणार आहे.