पुणे : प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवासला अंतर्गत खडकवासला, नऱ्हे, धायरी, नांदेड व किरकटवाडी येथे आयुष्मान आरोग्य मंदिरे सेवा देत आहेत. मात्र खडकवासला येथील मुख्य आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय झाली आहे.
ही इमारत खूप जुनी असून, ठिकठिकाणी गळती आणि अडगळीच्या जागांमध्ये ठेवलेला जुन्या वस्तूंचा राडारोडा अशा अडचणीत सापडलेली आहे. येथे तातडीने दुरुस्तीची गरज असून, रुग्णांसाठी सुरक्षित व स्वच्छ सुविधा मिळणे गरजेचे आहे.
खडकवासला आरोग्य केंद्रात उपचार चांगले मिळतात. जुन्या इमारतीमध्ये गळती, अडगळीच्या वस्तू आणि अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. दवाखाने महापालिकेकडे वर्ग करावेत आणि तातडीने दुरुस्ती व्हावी.
- रवी सुतार, खडकवासला