माझे हातपाय तोडताना कराडला लाईव्ह पाहायचं होतं, शरद पवार गटाच्या नेत्याच्या आरोपाने खळबळ!
Tv9 Marathi July 29, 2025 05:45 AM

Dhananjay Munde : कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केले असा आरोप करण्यात आला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना क्लीनचीट दिली आहे. असे असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. तसेच वाल्मिक कराड याला माझे हातपाय तोडताना लाईव्ह पाहायचं होतं, असंही त्यांनी म्हटलंय.

शिवराज बांगर यांचा दावा काय?

शिवराज बांगर यांनी बीडमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या संदर्भातील धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत‌. वाल्मिक कराड याने माझ्या खुनाची सुपारी दिली होती. त्याला माझे हातपाय तोडताना लाईव्ह पाहायचं होतं. ज्याला सुपारी दिली त्या सनी आठवले याने माझा खून केला नाही. त्यामुळे त्या सनी आठवलेला खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असा आरोप बांगर यांनी केला.

वाल्मिक कराडच्या पाठीमागे धनंजय मुंडे यांची ताकद

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे खुन प्रकरणानंतर आता सरपंच बापू आंधळेंचा खूनदेखील वालिमीक कराड याच्या सांगण्यावरूनच झाला आहे, असेही बांगर यांनी म्हटले आहे.तसेच वालिमीक कराड हा प्यादा आहे. वाल्मिक कराडच्या पाठीमागे धनंजय मुंडे यांची ताकद होती. त्चया ताकदीने हे सर्व करून घेतलेलं आहे. त्यामुळे मेरी कोई गलती नही, असं धनंजय मुंडे असं म्हणू शकत नाहीत, असा आरोप बांगर यांनी केला.

बबन गीते अडवा येईल म्हणून ही हत्या

बापू आंधळेंची हत्या गोट्या गीते आणि गँगने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केली. त्या गुन्ह्यामध्ये महादेव गितेला गोळ्या घातल्या तो जेलमध्ये आहे. विधानसभेला बबन गीते अडवा येईल म्हणून ही हत्या केली, असा आरोप करच एसआयटी नेमून बापू आंधळे खून प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवराज बांगर यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.