राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ
Saam TV July 29, 2025 07:45 AM
  • उल्हासनगरमध्ये कलानी गटाला भाजपकडून धक्का!

  • कलानी समर्थक नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

  • पक्षांतराचे वारे उल्हासनगरमध्ये!

  • माजी नगरसेवकांचा भाजपकडे ओढा वाढतोय!

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यानं कंबर कसली आहे. अशातच राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरूये. उल्हासनगरमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार ओमी कलानी यांचे समर्थक आणि माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. कलानी समर्थकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रवक्त्या श्वेता शालिनी यांची भेट घेतली होती. या पक्षप्रवेशामुळे कलानी गटाला मोठा धक्का बसू शकतो.

आगामी काळात उल्हासनगरमधीलराजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कलानी समर्थक असलेल्या काही माजी नगरसेवकांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रवक्त्या श्वेता शालिनी यांची भेट घेतली. यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. येत्या दोन दिवसांत हे नगरसेवक भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

या भेटीत सहभागी असलेले माजी नगरसेवक म्हणजे संजय सिंह (चाचा), सतरामदास जेसवानी, प्रभुनाथ गुप्ता, रवी बागूल, रमेश चैनानी आणि हरेश जग्यासी यांचा समावेश आहे. यावेळी कलानी गटातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. याबाबत संजय सिंह म्हणाले, "आम्ही काही माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. आमच्यासोबत आणखी काही नगरसेवकही येणार आहेत. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घेतला आहे."

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

कलानी गटासाठी मोठा धक्का

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ओमी कलानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. त्यावेळी बहुतेक माजी नगरसेवक त्यांच्यासोबत होते. मात्र आता त्यांच्यापैकी काहींचा भाजपकडे कल होत असल्याने हा कलानी गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.