जसप्रीत बुमराह नकोच…! प्रश्न विचारताच रवी शास्त्री यांनी हात जोडले, स्पष्ट सांगितलं की…
GH News July 29, 2025 08:14 PM

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीबाबत आपलं रोखठोक म्हणणं मांडलं आहे. रवी शास्त्री ह 2017 ते 2021 या कालावधीत टीम इंडियाच प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने अनेक चांगल्या कामगिरी केल्या. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघातील अनेक खेळाडू घडले आहेत. त्यामुळे त्यांना विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा सहवास लाभला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबतचा खुलासा केला. तसेच जसप्रीत बुमराह नको रे बाबा असा सूर देखील लावला. तसेच विराट कोहलीबाबत एक मोठं विधानही त्यांनी केलं. विराट कोहलीने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर जसप्रीत बुमराह इंग्लंडमध्ये खेळत आहे. असं असताना रवी शास्त्री यांच्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रवी शास्त्री यांना एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. हा व्हिडीओ स्टिक टू क्रिकेटने पोस्ट केला आहे. तसेच रवी शास्त्री यांनीही रिट्वीत केला आहे. रवी शास्त्री यांना विचारलं गेलं की, सध्या कोणता असा गोलंदाज आहे की त्याचा सामना करायला तुम्हाला आवडणार नाही? किंवा त्याचा सामना करणं टाळाल? रवी शास्त्री यांनी क्षणाचाही विलंब न करता जसप्रीत बुमराह याचं नाव घेतलं. जसप्रीत बुमराह सध्याच्या काळातील सर्वात घातक गोलंदाज आहे. त्याचा सामना करणं भल्याभल्या फलंदाजांना जमत नाही.

रवी शास्त्री यांना सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी विराट कोहलीचं नाव घेतलं. रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहली गेल्या दशकातील सर्वोत्तम खेळाडूच नाही, तर तो सर्वात प्रभावशाली खेळाडू देखील आहे. दरम्यान, विराट कोहली सध्या वनडे क्रिकेट खेळण्यास उपलब्ध आहे.

रवी शास्त्री यांनी मुलाखतीदरम्यान मिळालेल्या सर्वोत्तम सल्ल्याबाबतही सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर समालोचन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा सल्ला मिळाला होता, असं त्यांनी सांगितलं. रिची बेनॉड यांनी सांगितलं की, तुम्हाला किती शब्द बोलता याचे पैसे मिळत नाहीत तर तुम्ही काय बोलता याचे पैसे मिळतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.