दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरल्यास होम लोन 30 वर्षांऐवजी 17 वर्षांत संपवता येऊ शकतं.
50 लाखांच्या 8% व्याजदराच्या कर्जावर सुमारे ₹ 34 लाखांचं व्याज वाचवता येतं.
हे गणित जास्त पैसे भरण्याचं नाही, तर हुशारीने दरवर्षीची बचत वापरून लोन लवकर संपवण्याचं आहे.
Home Loan: घराचं स्वप्न पूर्ण करताना बहुतांश लोकांना होम लोन घ्यावं लागतं. मात्र, हेच कर्ज आयुष्याचं ओझं बनत जातं. 20-30 वर्षे कर्ज फेडत बसल्याने जवळपास अर्ध आयुष्य बँकेला व्याज भरण्यात जातं. पण, फक्त काही स्मार्ट निर्णय घेतल्यास हे ओझं मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतं, असं फाइनान्शिअल एक्स्पर्ट सीए नितिन कौशिक यांनी सांगितलं आहे.
कौशिक यांच्या मते, लोन घेताना आपल्याला लाइफस्टाइलशी तडजोड करण्याची किंवा जास्त पैसे भरण्याची गरज नाही. योग्य पद्धतीने अतिरिक्त पैसे फेडून आपण व्याजाचा भार कमी करून कर्जाची मुदत कमी करु शकतो. त्यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे.
जास्त मुदतीचं कर्ज का घ्यावं?बर्याच जणांना 30 वर्षांचं लोनम्हणजे व्याजाचं डोंगर वाटतं. पण, त्याचं एक फायद्याचं कारण आहे – हप्ते कमी असल्याने महिन्याचं बजेट ढासळत नाही. यामुळे दर महिन्याला काही रक्कम वाचवता येते आणि त्या पैशांचा योग्य वापर करून लोन लवकर संपवता येऊ शकतं.
उदाहरण :
होम लोन – 50 लाख रुपये
व्याजदर – 8%
30 वर्षांची ईएमआय – ₹36,688
20 वर्षांचा ईएमआय – ₹41,822
दरमहा बचत – ₹5,134 (30 वर्षांचं लोन घेतल्यास)
ही वाचलेली रक्कम वापरून दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरता येतो. अशा प्रकारे प्रत्येक वर्षीचा अतिरिक्त हप्ता थेट मूळ रकमेवर जातो आणि व्याजाचा भार झपाट्याने कमी होतो.
Premium|TCSची कर्मचारी कपात आणि IT क्षेत्राचं भवितव्य; IT कर्मचाऱ्यांनी आता फायनान्शिअल प्लॅनिंग कसं करावं? कर्ज 30 वर्षांत नव्हे, 17 वर्षांत कसं फेडता येईल?कौशिक यांच्या कॅलक्युलेशननुसार :
अतिरिक्त पेमेंट न केल्यास
एकूण व्याज – ₹82.1 लाख
एकूण रक्कम – ₹1.32 कोटी
कर्जाची मुदत – 30 वर्षे
दरवर्षी 1 अतिरिक्त ईएमआय भरल्यास
व्याज – ₹48 लाख
कर्जाची मुदत – 17 वर्षे
व्याज बचत – ₹34.1 लाख
13 वर्षांनी लवकर कर्जमुक्ती
कौशिक म्हणतात, "हे जास्त पैसे भरण्याचं नाही, तर हुशारीने पैसे भरण्याची ट्रिक आहे. सातत्याने छोट्या रकमांचे अतिरिक्त पेमेंट करून कुणीही लोन लवकर संपवू शकतो आणि आर्थिकस्वातंत्र्य मिळवू शकतो."
नोंद- हे कॅलक्युलेशन 50 लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेवर आणि वार्षिक 8% व्याजदरावर आधारित आहे.
FAQsप्र. 1: हे तंत्र कोणत्या प्रकारच्या होम लोनसाठी लागू आहे? (Which type of home loans does this method work for?)
- हे सर्व बँक आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या फ्लोटिंग रेट आणि फिक्स्ड रेट लोनसाठी लागू आहे.
प्र. 2: अतिरिक्त ईएमआय मूळ रकमेवर कसा परिणाम करतो? (How does the extra EMI affect the principal amount?)
- दरवर्षी दिलेला अतिरिक्त हप्ता थेट मूळ कर्जातून वजा होतो, ज्यामुळे व्याजाचा भार झपाट्याने कमी होतो.
प्र. 3: माझ्याकडे लहान लोन असेल (15-20 लाखांचं) तरी हे फायदेशीर आहे का? (Is this method useful for smaller loans too?)
- होय. व्याजदर आणि लोनची मुदत जितकी जास्त, तितका फायदा अधिक, पण लहान लोनवरही बचत होते.
प्र. 4: ही रक्कम दरमहा जमा करावी लागते का? (Do I need to save and pay this every month?)
- नाही. तुम्ही दरमहा बचत करून वर्षाच्या शेवटी एकाच वेळी अतिरिक्त ईएमआय भरू शकता.
प्र. 5: हे करून व्याज किती वाचू शकतं? (How much interest can be saved through this method?)
- 50 लाखांच्या 30 वर्षांच्या कर्जावर अंदाजे ₹ 34 लाखांचं व्याज वाचू शकतं आणि 13 वर्षं आधी कर्ज फेडता येतं.