बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2004 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या निर्घृण खूनाने संपूर्ण राज्य हादरले. त्यानंतर कोडग्या पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाविरोधात लोकलढा उभारल्या गेला, तेव्हा कुठे प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि आरोपींना अटक करण्यात आली. या खूनातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान आज या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला मोठा झटका बसला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचे निरीक्षण बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले. वाल्मीक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातले आणि 11 गुन्हे बीड जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहेत, हे निरीक्षणातून समोर आले आहे. आता
मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आकासह टोळीला फाशीच
धनंजय देशमुख यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड हा चार्जशीटमध्ये एक नंबरचा आरोपी आहे. हाच मुख्य आरोपी आहे असा स्पष्ट उल्लेख आहे. एक नंबरचा आरोपी आणि त्याच्या टोळीतील सर्वांना फाशीचीच शिक्षा होणार हे कोर्टाच्या निरीक्षणावरून निश्चित झालं आहे, असे देशमुख म्हणाले.
त्याने प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यामुळे त्याच्या समर्थकांना वाटत नव्हतं की त्याचं कायदा काही करू शकेल. पीडित लोकांनी बाहेर येऊ नये. घाबरून घरातच बसावं यामुळे तो सुटणार अशा अफवा सोडल्या जात होत्या. आता तो सुटणार नाही. तसं काहीच होणार नाही यामुळे पीडित लोकं बाहेर येऊ लागले आहेत. न्याय मागत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता ज्ञानेश्वरी ताईंसह इतरांसाठी लढा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय देण्यासाठी आयोजित बैठकीत आपण उपस्थित राहणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. न्यायाच्या भूमिकेत मला जे काही करावं लागेल ते मी करणार आहे. ज्या लोकांनी आरोपींना मदत केली होती. त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
हेच काटा आणि छापा
वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका कोर्टानं म्हटलंय. दोषमुक्तीचा अर्ज या केस मध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी आला. केस लांबवण्याचे प्रयत्न झाले. मकोका कोर्टानं नोंदवलेलं महत्वाचं निरीक्षण म्हणजे मुख्य सूत्रधार आकाच असल्याचं म्हटलंय. अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण महत्वाचं हे निरीक्षण कुणालाही वाचवू शकणार नाही. दोन आका हे शोलेतल्या कॉईनसारखे छापा पण हेच आणि काटा पण हेच आहेत असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. जेल मधून स्पेशल फोन सापडला आहे. आका वापरत असलेले फोन मधून डिटेल बाहेर पडतील, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार
धनंजय मुंडेंनी जो दावा केला होता तोच न्यायालयानं खोडून काढला. धनंजय मुंडेंना एकाच खरेदीत क्वीन चिट मिळालीय. धनंजय मुंडेंना मिऴालेल्या क्लीन चिटविरोधात मी स्वतः सुप्रीम कोर्टात जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आमदार सुरेश धस म्हणाले.
सर्व निर्णय आकाच घ्यायचा
मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे ती कृषी विभागात फक्त घोटाळा नाही तर अनेक निर्णय झाले आहेत. एका खरेदी बाबत जर निर्णय झाला असेल मात्र खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ७८ कंपनी स्थापन केल्या. खताचे लिंकिंग करण्याचे पाप मोठ्या प्रमाणात झाले. स्वतंत्र SIT स्थापन करण्याची गरज आहे ती मागणी मी करतो. धनंजय मुंडे यांच्या काळाचे घोटाळे आहे. त्यात ते स्वतः किती कृषी खातं चालवायचे हा संशोधनाचा विषय आहे कारण सर्वच खालच्या बैठका त्यांचे आका घेत होते.
महादेव मुंढे प्रकरण मी स्वतः बाहेर काढले.. यावर आधी कोणी बोलत नव्हतं. पण बोलत आहे. त्या माऊलीची काय चूक? महादेव मुंढे हत्या झाल्यानंतर पण आरोपी सापडत नाही म्हणून विष पिऊन पण झालं. त्या आता मुख्यमंत्री यांना भेटतील आणि त्यांना न्याय भेटेल असे वाटत आहे, असे आमदार धस म्हणाले.