Workation Travel Trend: काम आणि सुट्टीचा एकत्रित अनुभव, आता “वर्केशन” चा नवा ट्रॅव्हल ट्रेंड
Marathi July 31, 2025 01:25 PM

आजकाल अनेक नवीन नवीन ट्रॅव्हल ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लो ट्रॅव्हल, मान्सून ट्रॅव्हल हे आपण ऐकलेच आहे. अशातच आता आणखी एक ट्रॅव्हल ट्रेंड जोरात आहे. तो म्हणजे वर्केशन ट्रॅव्हल. याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आले असेल की काम आणि सुट्टीचा एकत्रित अनुभव म्हणजे वर्केशन. पर्यटन कंपन्यांकडून सध्या वर्केशन पॅकेज मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत.

वर्केशन म्हणजे काय?

वर्केशन म्हणजे काम आणि सुट्टीचा एकत्र अनुभव घेणे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन लॅपटॉपवर आपले काम सुरू ठेवणे याला वर्केशन म्हंटले जाते. ज्यांना सततची सुट्टी घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम ट्रॅव्हल ऑप्शन आहे. पर्वतीय भागात किंवा समुद्रकिनारी लोक आता काम करण्याला पसंती देत आहेत. एकूणच वर्केशन हा असा प्रवास आहे ज्यामध्ये काम आणि विश्रांतीची सांगड घातली जाते.

वर्केशनचे फायदे

  1. नवीन वातावरणात काम केल्याने बदल होतो आणि मन आनंदी होते.
  2. निसर्गरम्य ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत काम केल्याने मानसिक तणाव कमी होतो.
  3. लोकांना अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढते.
  4. नवीन ठिकाणी गेल्याने विविध गोष्टी शिकायला मिळतात.
  5. मूड फ्रेश राहण्यास मदत होते

हे लक्षात ठेवा

  • यामध्ये वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तुम्ही आधीच कामआणि सुट्टीचे नियोजन करून वर्केशन प्लॅन करावे.
  • वर्केशन प्लॅन करताना त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन, इतर कामासाठी लागणाऱ्या सुविधा असणे गरजेचे आहे.
  • योग्य जागा, चांगले नेटवर्क आणि शिस्तपूर्वक काम केल्यास वर्केशनचा अनुभव चांगला येतो.

फ्रिलान्सर, उद्योजक, व्यावसायिक हे वर्केशनचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकतात. कित्येक कंपन्या आता वर्केशन ही पॉलीसी स्वीकारत आहेत. ज्यामुळे ही आता एक लोकप्रिय जीवनशैली बनत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.