वर्ल्ड मल्याळी काऊन्सील म्हणजेच WMC ही जगभरात ओळखली जाणारी प्रसिद्ध अशी संघटना आहे. या संघटनेमार्फत जगभरातील मल्याळी नागरिकांच्या हितासाठी काम केले जाते. या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतेच जपानला भेट दिली. नेपाळमधील संबंध मजबूत व्हावेत म्हणून विकासाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी WMC संघटनेच्या प्रतिनिधींनी नेपाळला भेट दिली होती. या संघटनेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व गोल्बल प्रेसिंडेट डॉ. बाबू स्टीफन यांनी केले. त्यांचे नेपाळमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी नेपाळचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री दामोदीर भंडारी हे उपस्थित होते.
नेपाळमधील कामाला आमचे पूर्ण सहकार्य असेलया नेपाळ भेटीदरम्यान स्टीफन यांची भंडारी यांच्यीशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी भंडारी यांनी WMC या संघटनेच्या नेपाळमधील कामाला आमचे पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले. तसेच नेपाळमधील मल्याळी उद्योजकांना नवे उद्योग उभे करण्यासाठी प्रोत्साहितही केले.
भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांचीही भेटनेपाळच्या भेटीतील शिष्टमंडळात नवनियुक्त सरचिटणीस शाजी मॅथ्यू मुलामुटिल आणि उपाध्यक्ष सुरेंद्रन कन्नट यांचाही समावेश होता. या शिष्टमंडळाने नेपाळमधील मल्याळी समुदायाचे प्रतिनिधी आणि भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
नुकतीच WMC या संघनटेची बँकॉकमध्ये एक जागतिक परिषद झाली. या परिषदेनंतर WMC च्या शिष्टमंडळाने नेपाळला भेट दिली. लवकरच या शिष्टमंडळाची नेपाळच्या पंतप्रधानांशीही भेट होणार आहे.
WMC काय काम करते?जागतिक पातळीवर काम करणाऱ्या या संघटनेचे मुख्यालय अमेरिकेतली न्यू जर्सी येथे आहे. या संघटनेकडून बऱ्याच काळापासून जगभरातील मल्याळी जनतेशी संवाद साधला जातो. तसेच जगभरातील मल्याळी जनतेला जोडण्याचे काम या संघटनेकडून केले जाते. तसेच या संघटनेच्या माध्यमातून जगभरात सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले जाते.