पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकाऱ्याकडून मराठी भाषेला दुय्यम वागणूक
प्रवाशाला 'हिंदीत बोला' असे सांगितल्याने संताप.
मराठी एकीकरण समितीने आंदोलनाचा इशारा
संजय गडदे,साम टीव्ही
मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर स्थानकात हा प्रकार घडला. याप्रकरणी पश्चिम रेल्वेतील एका अधिकाऱ्याने तक्रार नोंदवणाऱ्या प्रवाशाला 'हिंदीत बोला, मराठी समजत नाही' असे उत्तर दिल्याने मराठी प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ladki bahin yojana : अपात्र महिला आणि बोगस भावांना दणका; अपात्र लाडक्यांकडून पैसे वसूल करणार, वाचा स्पेशल रिपोर्टमराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी विवेक सरवनकर यांना हा अनुभव आला आहे. रेल्वे संबंधित समस्येसाठी त्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मराठी ऐकून दुर्लक्ष केले आणि फक्त हिंदीत तक्रार करा, असा सल्ला दिला. “मग आम्ही महाराष्ट्र सोडायचं का?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
Malegaon Blast Case : RSS नेत्याच्या हत्येचा आरोप, मालेगाव प्रकरणात निर्दोष; प्रज्ञा सिंह ठाकूर कोण आहेत?राज्य शासनाने जिथे मराठी भाषेला मानाचा दर्जा दिला आहे, तिथेच केंद्र सरकारच्या यंत्रणेमध्ये अशाप्रकारचा भेदभाव होत असल्याने नागरिक मनापासून व्यथित झाले आहेत. सरवनकर यांनी सांगितले, 'रेल्वे ही लाखो मराठी प्रवाशांची दैनंदिन गरज आहे. तिथेच जर आमच्या मातृभाषेला अपमानित केलं जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. आम्ही या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत.'
Tribal Reservation : आदिवासी समाजासाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा गेमचेंजर निर्णय, ८ जिल्ह्यात सुधारित आरक्षण लागू मराठी एकीकरण समितीने आंदोलनाचा इशारा दिलासदर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मराठी एकीकरण समितीच्या तक्रारीनंतर रेल्वे काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.