सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केले. यावेळी अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच माणिकराव कोकाटे हे अधिवेशनात पत्ते खेळताना दिसल्याने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
अंजली दमानिया यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या भेटीबद्दलही भाष्य केले. अजित पवारांनी सुरुवातीला असे म्हटले होते की जर शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच आम्ही आमच्या मंत्र्यांवर कारवाई करणार, याला स्पर्धा म्हणावी लागेल. ही धक्कादायक बाब आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
कारवाई झाली नाही तर दुर्दैवीत्यांनी पुढे नमूद केले की, अजित पवारांनी कोकाटेंना किती वेळा माफ करणार? असे म्हटल्याचे ऐकलं आहे. माणिकराव कोकाटेंनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी माफी मागितली आहे, असे दमानिया यांनी निदर्शनास आणले. यात आपल्याला थेट कारवाई कुठेही झालेली दिसत नाही. एकदा ओसाड गावची पाटील की म्हणजे कृषिमंत्री पद हे म्हणणं तिथेच खरं तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. पण एकदा नाही अनेक वेळा विमा वर्ण म्हणा, शेतकऱ्यांना मारलेले टोले म्हणा किंवा ओसाड गावची पाटील की म्हणा इतकी विधान करून सुद्धा कारवाई झाली नाही. आता तर थेट पत्ते खेळताना जेव्हा दिसतात, तरी जर कारवाई झाली नाही तर दुर्दैवी आहे. खरं अजित पवारांनी हे करणं अपेक्षित होतं, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
ताबडतोब राजीनामा झाला पाहिजेयानंतर अंजली दमानिया यांनी रोहित पवारांच्या ट्वीटबद्दलही भाष्य केले. “अधिवेशनात काय करत होते, कोणी आरोप काय केले? मला त्याच्यात नाही पडायचे. आपल्याला दिसतंय की त्या अधिवेशनात पत्ते खेळत होते. एका मंत्र्याकडूनही अपेक्षा नक्कीच नसते. लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही तिथे अधिवेशनात जातात. हे जर तुम्ही कृत्य केलं, तर ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे,” असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले. अंजली दमानिया यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळत आहे.