चास, ता. २९ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पेशवेकालीन वैभव असलेल्या चास (ता. खेड) येथील भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या श्री सोमेश्र्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुमारे दहा हजार भाविकांनी गर्दी केली होती.
सर्व सोयींनी युक्त असलेल्या या देवस्थानसाठी समस्त ग्रामस्थ, चासकर-जोशी परिवार, संजयभाऊ घनवट युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. महंत सुरेश चासकर, सूर्यकांत चासकर, लक्ष्मीकांत चासकर, चंद्रकांत चासकर, कुमार साठे, सुहास दस्तुरे यांच्या पौराहित्यात शिवलिंगावर रुद्राभिषेक करण्यात आला.