वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 लीगला मोठा झटका बसला आहे. उद्या 31 जुलै रोजी भारत-पाकिस्तानमध्ये पहिला सेमीफायनल सामना आहे. या मॅचआधी स्पॉन्सर्सनी या लीगला मोठा झटका दिला आहे. स्पॉन्सर्सनी या सेमीफायनल मॅचमधून आपले हात काढून घेतले आहेत. त्यांनी स्पॉन्सरशिप देण्यास नकार दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतलाय. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही, अशी भूमिका स्पॉन्सर्सनी घेतली आहे. स्पॉन्सर्सच्या या भूमिकेमुळे इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्समध्ये सेमीफायनल मॅच होणार की नाही? या बद्दल संशय निर्माण झाला आहे. ईजमाय ट्रिपच्या या निर्णयाने लीगला मोठा झटका बसला आहे.
WCL 2025 च्या महत्त्वाच्या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने वेस्ट इंडिजला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने आधीच सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. दोन्ही टीम्समध्ये 31 जुलैला सेमीफायनल सामना होणार आहे. याआधी ईजमाय ट्रिपने स्पॉन्सरशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. WCL 2025 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सेमीफायनल सामन्याशी ईजमाय ट्रिपचा संबंध नसेल, असं ईजमाय ट्रिपचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी सांगितलं.
ईजमाय ट्रिपची भूमिका काय?
दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाही अशी ईजमाय ट्रिपची भूमिका आहे. आम्ही भारतासोबत आहोत. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशासोबत संबंध सामान्य बनवण्याच्या अशा प्रयत्नांवर त्यांनी टीका केली. माघारीचा निर्णय आम्ही आम्ही फॅन्सच्या भावना लक्षात घेऊन घेतला आहे. निशांत म्हणाला की, ‘फॅन्सनी त्यांचा मुद्दा मांडला आणि आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो’
काही गोष्टी खेळापेक्षा मोठ्या
“आम्ही वर्ल्ड चॅम्पियंसशिप ऑफ लीजेंड्समध्ये टीम इंडियाच्या शानदार प्रदर्शनाच कौतुक करतो. तुम्ही संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरुद्ध आगामी सेमीफायनल काही साधारण मॅच नाहीय. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाही. ईजमाय ट्रिप भारतासोबत आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशासोबत संबंध सामान्य बनवण्याच्या अशा कुठल्याही प्रयत्नाच आम्ही समर्थन करु शकत नाही. काही गोष्टी खेळापेक्षा मोठ्या आहेत. देश आधी, व्यापार नंतर” असं ईजमाय ट्रिपच्या को-फाऊंडरने म्हटलय.
India vs Pakistan – WCL Semi-Final
We applaud Team India @India_Champions for their outstanding performance in the World Championship of Legends, you’ve made the nation proud.
However, the upcoming semi-final against Pakistan is not just another game, Terror and cricket cannot…
— Nishant Pitti (@nishantpitti)
20 जुलैला साखळी फेरीत भारताच्या काही खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध WCL 2025 मध्ये खेळायला नकार दिला होता. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागलेला. WCL च्या आयोजकांनी भारतीय चाहत्यांची माफी मागितेलली.