Earthquake : जपानसह इतर देश खरंच बुडणार? भारताला पण धोका? 8.8 तीव्रतेचा महाभूकंप; हिरोशिमावरील 14,300 अणुबॉम्बशी का तुलना?
GH News July 30, 2025 07:13 PM

रशियाजवळील द्वीपसमूहाला 8.8 तीव्रतेच्या भूकंपाने हादरा दिला. जपानसह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये त्यामुळे धडकी भरली आहे. हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकण्यात आला. जवळपास 14,300 अणुबॉम्बच्या एकाच वेळी झालेल्या स्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेशी त्याचा संबंध जोडण्यात येत आहे. रशिया, जपान आणि भारत सारख्या देशांना त्याचा काय धोका होऊ शकतो? या भूकंपाची ताकद, त्याचा वैज्ञानिक आधार आणि जागतिक परिणाम काय असतील?

8.8 तीव्रतेच्या भूकंपाची किती ताकद?

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर वा मोमेंट मॅग्निट्यूड स्केलवर (Mw) मोजण्यात येते. ही एक लॉगरिदमिक असते. याचा अर्थ तीव्रतेतील प्रत्येक एकक वाढीमुळे भूकंपाची ऊर्जा सुमारे 31.6 पट वाढते. उदाहरणार्थ, 8.8 तीव्रतेचा भूकंप 7.8 तीव्रतेच्या भूकंपापेक्षा 31.6 पट जास्त ऊर्जा सोडतो. 6.8 तीव्रतेच्या भूकंपाच्या तुलनेत, तो सुमारे 1,000 पट जास्त प्राणघातक असू शकतो.

हा तर महाभूकंप

8.8 या तीव्रतेचा भूकंप, महाभूकंपात मोडतो. त्यामध्ये संपूर्ण शहर उद्धवस्त करण्याची क्षमता असते. शास्त्रज्ञानुसार, 8.8 तीव्रतेचा भूंकप 9 x 10^17 ज्युल ऊर्जा बाहेर टाकतो.

अणुबॉम्बशी तुलना किती अचूक आहे?

हिरोशिमावर टाकलेल्या ‘लिटिल बॉय’ अणुबॉम्बने सुमारे 15 किलोटन टीएनटी (6.3 x 10^13 जूल) ऊर्जा निर्माण केली होती. आता 8.8 तीव्रतेच्या भूकंपाच्या (9 x 10^17 जूल) एकूण उर्जेची या बॉम्बशी तुलना जर केली तर, (9 x 10^17) ÷ (6.3 x 10^13) = 14,300

म्हणजे हा महाभूकंप जवळपास 14,300 हिरोशिमा अणुबॉम्ब इतकी ऊर्जा बाहेर टाकतो. म्हणजे ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळेच या महाभूकंपाची तीव्रता भयावह आहे. त्सुनामीचा धोका त्यामुळेच वर्तवण्यात येत आहे.

रशिया आणि जपानमध्ये धोका का?

8.8 तीव्रतेचा हा महाभूकंप कामचटका द्वीपसमूह हा रशियात येतो. हा द्वीपसमूह हा जपानच्या अगदीजवळ आहे. हे क्षेत्र Pacific Ring of Fire मध्ये येते. पृथ्वीची टेक्टोनिक प्लेट्स सतत एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे होणारे भूकंप सामान्य आहेत. 2011 मध्ये आलेला तोहोकु भूकंप हा 9.0 तीव्रतेचा होता. हा जपानच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप ठरला. या महाभूकंपाने त्सुनामी आली. त्याचा फटका फुकुशिमा अणु संयंत्रमधील रेडियोएक्टिव गळतीने झाला. भारताच्या तामिळनाडू, आंध्र प्रदेशासह इतर अनेक राज्यांना त्यावेळी त्सुनामीचा तडाखा बसला होता. त्यामुळे केवळ जपानच नाही तर भारतासारख्या देशाने सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.