एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. मात्र, आता खडसे कुटुंबियांकडून वेगळाच दावा केला जातोय. फक्त दावाच नाही तर थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप करण्यात आली. पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी छापेमारी करत काही महिलांसह पुरूषांना देखील ताब्यात घेतले. पुणे पोलिसांनी जावयावर पाळत ठेवल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट
आता पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी मोठी अपडेट पुढे आलीये. हॉटेल तेच तारीख वेगळी, एप्रिल मे महिन्यात सुद्धा तिथेच अशाप्रकारची पार्टी झाल्याची माहिती मिळतंय. पुण्यातील खराडीच्या स्टे बर्डमध्ये एप्रिल, मे महिन्यात पार्टी रंगली होती. एप्रिल महिन्यात 6 लोकांसाठी ३ रुम बुक करण्यात आल्या होत्या. मे महिन्यात 2 व्यक्तींसाठी २ रुमचे बुकिंग करण्यात आले.
हाउस पार्ट्यांची होणार सखोल चाैकशी
या दोन्ही महिन्यात स्टे बर्ड मध्ये झालेल्या “हाउस पार्टी” ची चाैकशी ही होणार आहे. दोन महिन्यात दोन वेळा झालेल्या या पार्टीमध्ये कोण कोण आणि कुठून आले होते याची चौकशी होणार आहे. एप्रिल, मे महिन्यातील पार्टीमध्ये अमली पदार्थ आणले गेले का याचा देखील तपास होणार आहे. यामधून काही महत्वाची माहिती पुढे येते का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर एकनाथ खडसेंना मोठा संशय
एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी हे सर्वकाही सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. यासोबतच एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले की, माझ्या जावयाने त्याच्या पूर्ण आयुष्यात कधी ड्रग्स बघितला नाही आणि त्याने सांगितले की, त्याने कोणत्याही प्रकारचा ड्रग्स घेतला नाही, त्याला फसवण्यात आले. माझा कोणत्याही मंत्र्यावर आरोप नाही. पुणे पोलिसांवर संशय असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले. संजय राऊत यांनी रेव्ह पार्टी प्रकरणावरून गिरीष महाजन यांच्यावर टीका केली होती.