धुळे : धुळे शहर महापालिकेकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. दरम्यान अतिक्रमण कारवाई वेळी भाजी विक्रेत्या महिलेला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे संतप्त विक्रेत्यांकडून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धुळेशहरात ठिकठिकाणी अतिक्रमक काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत आज दत्त मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय केला असून याठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात येत असताना मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यातच एका महिला भाजी विक्रेतीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप इतर विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
Shani Shingnapur : शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरण; धक्कादायक माहिती आली समोर, कर्मचाऱ्यांच्या खात्यात १ कोटीहून अधिक रक्कम जमापोलीस व मनपा प्रशासनाची संयुक्त कारवाई
शहरातील दत्त मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला बसून भाजी विक्रेते आपला व्यवसाय करतात. वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन महानगरपालिकेने या विक्रेत्यांना नवरंग पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्या नवीन जागेवर सतत पाणी साचत असल्याने आणि व्यवसाय होत नसल्याने विक्रेते पुन्हा आपल्या जुन्या जागी परतले. यामुळे आज पोलीसप्रशासन आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्यावर संयुक्त कारवाई सुरू केली.
Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशयरास्ता रोको करत निलंबनाची कारवाई
कारवाई करत असताना पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. याचवेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने भाजी विक्रेत्या महिलेला धक्काबुक्की करून मारहाण केली; असा गंभीर आरोप उपस्थित विक्रेत्यांनी केला. या प्रकारामुळे विक्रेत्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.