Maharashtra Politics Live Update : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
Sarkarnama July 31, 2025 05:45 PM
मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी जामीनावर बाहेर

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी हे मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी जामीनावर तुरुंगाबाहेर होते. मात्र, आता त्यांची निर्दोष मुक्कता झाली असल्याचे त्यांचे वकील यांनी सांगितले. 

Malegaon blast case : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग,कर्नल पुरोहित निर्दोष मुक्तता

एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांची मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीशांनी निकाल दिल्यानंतर हा न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात आज एनआए विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर निकाल दिला आहे. यामध्ये पुराव्यांच्या अभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ज्या गाडीत स्फोट झाला ती साध्वी प्रज्ञासिंग हिचे असल्याचे पुरावे नाहीत.

कोर्टात निकाल वाचनाला सुरुवात

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात आज एनआए विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर निकाल देत आहे. सर्व आरोपी कोर्टात दाखल झाले आहेत. वकील देखील हजर झाले आहेत. न्यायालयात निकालाचे वाचन सुरु आहे. त्यानंतर काही वेळात निकाल जाहीर होईल.

न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात आज एनआए विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर निकाल देणार आहे. न्यायालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागून आहे.

'माधुरी'ला गुजरातला नेले, राजू शेट्टींकडून अनोखा निषेध, नंबर पोर्ट केला

नांदणी येथील माधुरी हत्ती अंबानी उद्योग समुहाने वनतारा येथे पेटाला हाताशी धरून घेऊन गेल्याच्या निषेधार्थ रिलायन्सच्या सर्व वस्तूवर बहिष्कार टाकण्याची ही मोहिम गावकऱ्यांनी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वत:चा जीओ चा नंबर एअरटेलमध्ये पोर्ट करत या मोहिमेत सहभाग घेतला.

पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विकास खारगेंवर महसूल विभागाची जबाबदारी

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये IAS अजीज शेख, यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई. येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर अशीमा मित्तल जालनाच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या जालना जिल्हाधिकारीपदावरून ठाणे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर, विकास खारगे यांची बदली अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग येथे करण्यात आली आहे. तर, अनिल डिग्गीकर यांची बदली अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात करण्यात आली आहे.

ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी श्रीकृष्णनाथ पांचाळ

ठाणे जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे सेवानिवृत्त झाले आहेत.

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान देखील शिंचे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. आता ते पुन्हा दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला ते गेले असल्याची माहिती आहे. तसेच ते या दौऱ्यात मोठ्या एनडीएतील मोठ्या नेत्यांच्या भेटी देखील घेणार असल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे आयोजन

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी येत्या १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

अदानींना400 एकर जमीन, यशोमती ठाकूरांची सरकारवर टीका

राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, सरकारमधील मंत्रीच म्हणत आहे की “खाते चालवायला पैसे नाहीत” पण हे सरकार अदानींना तळोजा एमआयडीसीची ४०० एकर जमीन खैरातीत वाटत आहे. शेतकरी, युवा, कामगार, सर्वसामान्य माणूस या भाजप महायुती सरकारच्या अकार्यक्षम व चुकीच्या धोरणांनी होरपळतोय, पण मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी हेच सरकार खजिन्याचे दरवाजे उघडतंय. हे भाजप महायुती सरकार जनसामान्यांचे नाही तर फक्त भांडवलदार उद्योगपतींचे आहे. सरकार आणि उद्योगपती तुपाशी, जनता उपाशी... हीच आजच्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल

2008 मध्ये झालेल्या मालेगाव शहरातील भीषण बॉम्बस्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी भाजपच्या माजी खासदास साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जण संशयीत आरोपी आहे. त्यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी एनआयएने केली आहे. या प्रकरणाला 17 वर्ष पूर्ण झाली आहे असून या प्रकरणाचा अंतिम निकाल आज येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.