इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आाला आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला हा सामना बरोबरीत राखल्यानंतरही मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर भारताला कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉसला 4 मिनिटं विलंब झाला. दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार ओली पोप याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.