पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये घरी मक्यापासून बनवा ‘हे’ 3 चविष्ट पदार्थ,
GH News July 31, 2025 05:49 PM

पावसाळा सुरू झाला की या आल्ल्हाददायक वातावरणात आपण छानपैकी गरमा गरम भजी आणि चहा किंवा कॉफीचा आनंद घेत असतो. तसेच पावसाळ्यात भाजलेला मका खाण्याची मज्जाच वेगळी असते. पण तुम्हाला वाटते का की पावसाळ्यात मका फक्त भाजलेल्या मक्यापुरता मर्यादित आहे ? जर हो, तर तुम्हाला अजूनही चवींच्या अद्भुत दुनियेची माहिती नाही. कारण आपण मक्यापासून उत्तम चविष्ट पदार्थ बनवू शकतो. तर आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी मक्यापासून बनवलेल्या 3 अशा रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्या बनवायला सोप्या तर आहेतच पण चवीतही अतुलनीय आहेत.

1. कुरकुरीत कॉर्न

लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच कुरकुरीत कॉर्न हा नाश्ता आहे जो सर्वांना आवडतो, तर हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि चहासोबत एक उत्तम पर्याय आहे.

साहित्य:

मक्याचे दाणे: 1 कप

कॉर्नफ्लोअर: 2 टेबलस्पून

तांदळाचे पीठ: 1 टेबलस्पून

मीठ: चवीनुसार

काळी मिरी पावडर: 1/2 टीस्पून

लाल तिखट: 1/2 टीस्पून

तेल: तळण्यासाठी

बारीक चिरलेला कांदा आणि सिमला मिरची (सजावटीसाठी)

पद्धत:

मक्याचे दाणे पाण्यात उकडवून घ्या. यानंतर मक्याचे दाणे उकडून घेतल्यानंतर पाणी काढून टाका आणि थंड होऊ द्या.

एका मोठ्या भांड्यात उकडलेले मक्याचे दाणे, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, मीठ, मिरपूड आणि लाल तिखट एकत्र करा आणि चांगले मिक्स करून घ्या.

एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात वरील मक्याचे दाणे टाका आणि सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

बारीक चिरलेले कांदे आणि सिमला मिरचीने सजवून गरमागरम कुरकुरीत कॉर्न सर्व्ह करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही थोडा चाट मसाला देखील त्यावर टाकू शकता.

2. कॉर्न कटलेट

जर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी निरोगी आणि चविष्ट स्नॅक्स शोधत असाल तर कॉर्न कटलेट हा एक उत्तम पर्याय आहे. ते बनवायला सोपे आहे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे.

साहित्य: मक्याचे दाणे: 1 कप (उकडलेले आणि हलके मॅश केलेले)

उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे: 2 मध्यम आकाराचे

बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या: 1-2

बारीक चिरलेली कोथिंबीर: 2 टेबलस्पून

आले-लसूण पेस्ट: 1 टीस्पून

ब्रेडक्रंब: 2-3 टेबलस्पून (किंवा आवश्यकतेनुसार)

जिरे पावडर: 1/2 टीस्पून

गरम मसाला: 1/2 टीस्पून

मीठ: चवीनुसार

तेल: तळण्यासाठी

पद्धत:

एका मोठ्या भांड्यात उकडलेले मॅश केलेले कॉर्न आणि बटाटे घ्या.

हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर , आले-लसूण पेस्ट, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ टाकून मिश्रण चांगले मिक्स करा.

मिश्रणातून लहान कटलेट बनवा.

कटलेट कुरकुरीत होण्यासाठी ब्रेडक्रंब दोन्ही बाजूनी लावून घ्या.

एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि कटलेट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

गरमागरम कॉर्न कटलेट हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

3. कॉर्न चाट

संध्याकाळी हलक्या भूकेसाठी कॉर्न चाट हा एक उत्तम पर्याय आहे. तो लवकर तयार होतो आणि त्याची तिखट चव सर्वांना आवडते.

साहित्य:

मक्याचे दाणे: 1 कप (उकडलेले)

बारीक चिरलेला कांदा: 1/4 कप

चिरलेले टोमॅटो: 1/4 कप

बारीक चिरलेली कोथिंबीर पाने: 2 टेबलस्पून

हिरवी मिरची: 1 (बारीक चिरलेली, पर्यायी)

लिंबाचा रस: 1 टेबलस्पून

चाट मसाला: 1 टीस्पून

काळे मीठ:1/2 टीस्पून (किंवा चवीनुसार)

भाजलेले जिरे पावडर: 1/2 टीस्पून

पातळ शेव किंवा नमकीन (गार्निशसाठी)

पद्धत:

एका भांड्यात उकडलेले मक्याचे दाणे घ्या.

बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाका.

आता लिंबाचा रस, चाट मसाला, काळे मीठ आणि भाजलेले जिरे पावडर या मिश्रणात टाकून चांगले मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात काही उकडलेले शेंगदाणे किंवा डाळिंबाचे दाणे देखील टाकू शकता.

कॉर्न चाट लगेच सर्व्ह करा आणि त्यावर बारीक शेव किंवा नमकीन शेव देखील टाका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.