कार टिप्स, कार हॅक्स, कार गॅजेट्स अशी टायटल असलेले अनेक आर्टिकल तुम्ही वाचले असतील, अनेक व्हिडीओ देखील तुम्ही पाहिले असतील. या टिप्स अनेकदा तुम्हाला उपयोगी देखील पडतात. मात्र काही वेळेला अशा टिप्स पाहून तुमचा अपेक्षाभंग देखील होतो, कारण त्यामध्ये फार काही सांगितलेलं नसतं. आता आम्ही हे सर्व तुम्हाला का सांगत आहोत, यामागे देखील एक कारण आहे, तुम्ही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहिलाचं असेल, सध्या हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, गाडी पार्क करताना टायरच्यामध्ये पाण्याची रिकामी बाटली ठेवायला पाहिजे.
ज्यांनी-ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, सहाजिकच त्यांना देखील हा प्रश्न पडलाच असेल की, असं का करायला पाहिजे? कार पार्किंग करताना चाकामध्ये रिकामी पाण्याची बाटली का ठेवली पाहिजे? यामुळे गाडी पंक्चर होत नाही का? जर अशी बाटली ठेवली तर पार्किंगमधील गाडी पुढे जाण्याचा धोका टळतो का? जर तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील तर या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत.
या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गाडी पार्क करताना गाडीच्या टायरमध्ये पाण्याची बाटली ठेवली पाहिजे, मात्र असं का करावं याच काहीच कारण नाहीये, ज्याला आपण फसवी पोस्ट असं म्हणू शकतो. हा फक्त मार्केटिंगचा एक फंडा आहे. अनेक कंपन्या आपला नफा वाढवण्यासाठी या सारख्या क्लिक बेल्ट जाहिराती तयार करत असातत तसाच तो प्रकार आहे. मात्र हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, आणि अनेकांनी तर हा व्हिडीओ पाहून आपली कार पार्किंग केल्यानंतर तिच्या टायरमध्ये बाटली ठेवायला सुरुवात केली आहे. तुम्ही जेव्हा असं काही वाचून त्या लिंकवर क्लिक करता तेव्हा या पोस्टसोबतच संबंधित कंपनीची एक जाहिरात देखील ओपन होते, ती जाहिरात ग्राहकांना दिसावी यासाठी अनेक कंपन्या सध्या अशाप्रकारचे फंडे अजमावत आहेत.
दरम्यान या ट्रिकला काही जण चोराशी देखील जोडतात, तुमची कार जेव्हा गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली असते, तेव्हा चोर अशाप्रकारे तुमच्या कारच्या चाकामध्ये बाटली अडकवतात, तुम्ही थोडे अंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कारमधून आवाज ऐकायला येतो. तुम्ही तुमची कार उभी करून नेमकं काय झालं, हे पाहाण्यासाठी खाली उतरतात, त्याचाच फायदा घेऊन चोर तुमचं किंमती सामान घेऊन पळ काढतात असा दावा देखील काही जणांनी या संदर्भात केला आहे.