प्रतिक्षा संपली! लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाची भेट, कधी जमा होणार खात्यात 1500 रुपये?
Marathi August 02, 2025 12:26 AM

लाडकी बहिन योजना: लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देते. दरम्यान, जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार असा सवाल केला जात होता. आता त्याची प्रतिक्षी संपली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (1500 रुपये) वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै  2024 पासून सुरु केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीयोजने तील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी 28290 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता

जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे.  21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरु झाल्यापासून 13 वा हप्ता मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

सरकार दलालीच्या दलदलीत पोखरलंय! लाडकी बहिण योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांचा हल्लाबोल

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.